आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Alibaba By R. Jagannathan, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलिबाबासह बड्या ऑनलाइन रिटेल कंपन्यांचे पर्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्या नकाशात मागील आठवड्यात एका मोठ्या तंत्रज्ञान कंपनीचा उदय झालेला आपण पाहिला. चीनचा नागरिक जॅक मा याच्या नेतृत्वाखालील ऑनलाइन रिटेल कंपनी अलिबाबा हे या कंपनीचे नाव. कंपनीने आपल्या आयपीओद्वारे ३२ कोटी समभाग विक्रीस आणले होते आणि ऑफर प्राइस ६८ डॉलर प्रति समभाग ठेवली होती.
शुक्रवारी न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर पहिल्या िदवशी कंपनीचे समभाग ३८ टक्के वाढीसह ९३.८९ डॉलरवर बंद झाले. मार्च २०१४ च्या स्थितीनुसार कंपनीचा वार्षिक नफा ३.७ अब्ज डॉलर होता. मात्र या बंद भावासह कंपनीचे बाजारमूल्य वाढून २३१ अब्ज डॉलरवर पोहोचले. या कंपनीच्या वार्षिक नफ्याच्या ६० पटींनी हे जास्त आहे. रुपयांत सांगायचे झाले तर अलिबाबाचे बाजारमूल्य १४,०४,७११ कोटी रुपये होते. आपल्या देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या बाजारमूल्याच्या सुमारे तीनपट जास्त आहे.
एखाद्या तांत्रिक कंपनीचे बाजारमूल्य अचानक असे वाढणे यात नवीन काहीच नाही.
कोणत्याही कंपनीचे समभाग खरेदी करताना गुंतवणूकदार कंपनीचा सध्याचा नव्हे तर आगामी काळातील नफा लक्षात घेऊन खरेदी करतात. यामुळेच फेसबुक व अ‍ॅमेझोनचे बाजारमूल्य नफा कमी असतानाही अनुक्रमे २०२ अब्ज डॉलर आणि १५३ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. काही लोकांच्या मते, अलिबाबाच्या समभागांच्या िकमतीत आलेली उसळी म्हणजे आभाळाएवढ्या अपेक्षा ठेवल्याचा परिणाम आहे. मात्र अलिबाबा ही जगातील सर्वाधिक नफा कमावणा-या आयटी कंपन्यांपैकी एक आहे, हे सत्य आहे. चीनच्या बाजारपेठेत ८० टक्क्यांहून जास्त हिस्सेदारीवर कंपनीचा ताबा आहे. कंपनीचा चांगला विस्तार होण्याची शक्यता जास्त आहे. आयपीओनंतर कंपनीकडे २२ अब्ज डॉलरपेक्षा (१.३३ लाख कोटी रुपये) जास्त रोकड आली आहे. अशा प्रकारे अलिबाबा ही जगात सर्वात जास्त कॅश रिच टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक कंपनी बनली आहे. आता अलिबाबा जगातील कोणत्याही क्षेत्रातील हवी ती कंपनी खरेदी करू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर इन्फोसिसचे घेऊ, हिचे बाजारमूल्य २.१२ लाख कोटी रुपये आहे.
अलिबाबाच्या मनात आले तर आयपीओतून जमलेल्या रकमेपेक्षा निम्म्या रकमेत ती इन्फोसिस खरेदी करू शकते. वास्तवात अलिबाबा असे करणार नाही, मात्र आयपीओतून आलेल्या पैशांतून अलिबाबा केवळ कंपनीच खरेदी करू शकते असे नव्हे, तर अमेरिका व युरोपाच्या बाजारात विस्तारासाठी गुंतवणूक करू शकते.

अलिबाबा भारतात ऑनलाइन रिटेलर स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्नॅपडील भारतात मोबाइलपासून ते कॅमेरे, घड्याळेही व्रिक्री करते. एवढेच नव्हे तर कार आणि घरांचेही बुकिंग ही कंपनी करते. खासगी इक्विटी कंपन्यांनी मागील फंडिंगच्या वेळी स्नॅपडीलची किंमत १ अब्ज डॉलर (६००० कोटी रुपये) गणली होती. स्नॅपडीलने केलेल्या एक अब्ज डॉलरच्या व्रिक्रीच्या आधारे ही किंमत ठरवण्यात आली होती. अशा रीतीने आणखी एक भारतीय ऑनलाइन रिटेल कंपनी फ्ल‍िपकार्टची किंमत गुंतवणूकदारांनी ७ अब्ज डॉलर (४२,५०० कोटी रुपये) ठरवली आहे. व्रिपकार्ट अजून नफ्यात नसून येणा-या काही वर्षांत ती नफ्यात येण्याची अपेक्षा आहे.

जग आता अशा लोकांवर पैसा लावत आहे जे इंटरनेटद्वारे खरेदी करणा-या कंपन्या आहेत. यामागची कारणे स्पष्ट आहेत, एक तर इंटरनेटद्वारे वस्तू खरेदी करणे व पैसे देणे अत्यंत सोपे आहे. दुसरे म्हणजे या कंपन्या ग्राहकांना एवढे िवविध पर्याय देत आहेत की आगामी काळात ऑनलाइन रिटेलचा व्यवसाय गतीने वाढणार आहे. एखादा मोठा मॉल अशा प्रकारे इतकी उत्पादने सादर करू शकत नाही, जेवढे अलिबाबा किंवा फ्ल‍िपकार्टसारख्या ऑनलाइन कंपन्या करू शकतात. त्यामुळे या कंपन्यांचे मूल्य सध्याच्या नफ्यावर िनर्धारित करणे योग्य नसल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. उदाहरणार्थ अलिबाबाचे एकट्या चीनमध्ये सध्या २८ कोटी ग्राहक आहेत. आगामी काळात ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे जास्त बाजारमूल्य पाहता देश आणि जगातील इतरही िरटेल कंपन्या शेअर बाजारातून रक्कम उभी करण्याकडे आकर्षित होतील. एकदा का या कंपन्या बाजारात नोंदणीकृत झाल्या की स्पर्धा वाढून कमी दरात उत्पादने विकावी लागतील. समभागांची जास्त िकंमत म्हणजेच अलिबाबा, अ‍ॅमेझॉन आणि िफ्लपकार्ट यासारख्या कॅश िरच ऑनलाइन िरटेल कंपन्या गुंतवणूकदारांच्या पैशांतून कंपन्या आणि ग्राहकांचा िवश्वास खरेदी करतील. ऑनलाइन िरटेल बाजारपेठेत अनेक बड्या कंपन्या येतील तेव्हा स्पर्धा तीव्र होऊन ग्राहक राजा होईल. यात सर्वसामान्यांचे काहीच नुकसान नाही. मात्र काही िरटेल कंपन्या तोट्यात गेल्या तर गुंतवणूकदारांना त्याचा फटका बसू शकतो.

लेखक आर्थिक िवषयांचे ज्येष्ठ पत्रकार असून फोर्ब्ज इंडियाचे एडिटर इन चीफ आहेत.
rjagannathan@dainikbhaskargroup.com