Home »Business »Gadget» Article On Android Application

FACTS: स्मार्ट आणि सर्वात जलद ANDROID

शादाब समी | Feb 22, 2013, 11:47 AM IST

नोकिया कंपनीने अलीकडेच विक्री केलेल्या संलग्न कंपनीने अ‍ॅड्रॉइड फोन तयार करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मोबाइल क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. जगात अ‍ॅड्रॉइडचे प्रस्थ एवढय़ा झपाट्याने का वाढत आहे?


संगणक चालवण्यासाठी ज्याप्रमाणे विंडोज, लिनक्ससारख्या ऑपरेटिंग सिस्टिम असतात, त्याप्रमाणे स्मार्टफोनसाठीही ऑपरेटिंग सिस्टिमची गरज असते. याच्या मदतीनेच इतर अ‍ॅप्लिकेशन्स काम करत असतात. फोन स्मार्ट ठरण्यात त्याची ऑपरेटिंग सिस्टिम महत्त्वाची असते. आपल्या मोबाइलवर कोणकोणती अ‍ॅप्स चालू शकतात हे या प्रणालीवर अवलंबून असते. तसेच प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिमचा एक अ‍ॅप्लिकेशन स्टोअर असतो. जेथून आपण आपल्याला हवे असलेले अ‍ॅप डाउनलोड करू शकतो.

गेमपासून आरोग्य विषयांपर्यंत विविध अ‍ॅप्स कंपन्यांकडे उपलब्ध आहेत, तर बाजारात लाखो अ‍ॅप्सची रेलचेल झाली आहे. अ‍ॅड्रॉइड हीसुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टिम किंवा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे. आज जगात जेवढे स्मार्टफोन आहेत त्यात अ‍ॅड्रॉइडची संख्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहे. इन कॉर्पोरेशन या कंपनीने अ‍ॅड्रॉइड ही प्रणाली विकसित केली होती. 2005 मध्ये गुगलने अ‍ॅड्रॉइड विकत घेतली. इंटरनेटच्या विश्वात गुगल सर्च आणि जीमेलचा बोलबाला असल्याने हे वापरणार्‍या व्यक्ती अ‍ॅड्रॉइडलाच जास्त पसंती देतात.

Next Article

Recommended