आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Bentale Continental V 8 S Car, Divya Marathi

बेंटलेची काँटिनेंटल व्ही 8 एस कार लवकरच.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंटले कंपनीची काँटिनेंटल व्ही 8 एस कार जुन्या मॉडेलसारखीच दिसते. मात्र, काही वैशिष्ट्ये या कारचे वेगळेपण सिद्ध करतात.

* बेंटल कंपनीची नवी काँटिनेंटल व्ही 8 एस कारच्या दिसण्यात फारसा वेगळेपणा नाही. मात्र, कुपे व कन्व्हर्टेबल दोन्ही मॉडेल्समध्ये केलेला अल्पसा आधुनिक बदलही लक्षवेधी आहे.
* जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या कारच्या फ्रंट ग्रिलमध्ये बदल करण्यात आलाय. ब्लॅक्ड-आऊट फ्रंट स्प्लिटर, साइड स्कर्ट व रिअर डिफ्यूज यात नावीन्य आहे.
* 20 इंची अलॉय व्हीलला ओपन स्पोक डिझाइन दिले आहे. ब्लॅक्ड-आऊट विंग मिरर व रेड ब्रेक कॅलिपर याची खास वैशिष्ट्ये आहेत.
* डायमंड-क्विल्टेड लेदर इंटेरिअर ट्रीम व ज्वेल्ड फ्युएल-फिल कॅप ही याची खासियत आहे.
* केबिनमध्ये नवे फिनिशिंग व टेक्स्चर बघायला मिळतील. सर्व कंट्रोल्स असल्याने चालवण्यासाठी ही कार अत्यंत सोपी आहे.
* वेगाच्या बाबतीत ही अजोड कार आहे. 5 सेकंदांत ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने ही धावते. ताशी 309 किलोमीटर हा कारचा सर्वोच्च वेग आहे.
* इंजिनला सक्षम बनवण्यासाठी यात 8- स्पीड झेडएफ क्विक शिफ्ट गिअर बॉक्स आहे. याचे स्पोर्ट्स मोडही उपलब्ध आहे.
* ट्विन टेलपाइप, इंजिनपेक्षा कारमध्ये जास्त सस्पेन्शन आहे. हेच काँटिनेंटल व्ही 8 एसचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
* याचे कार्बन सिरॅमिक ब्रेक पर्यायी म्हणून दिले आहेत. स्पोर्टीअर सस्पेन्शनशिवाय कंफर्ट मोडमध्ये कार चालवण्याचा अनुभव जबरदस्त आहे.
* चार आसनांची व्यवस्था कारमध्ये असली तरीही मागची बाजू ऐसपैस नसल्याने अडचण होते. यात 8 इंची इन्फोटेमेट स्क्रीन आहे.
* काँटिनेंटल व्ही 8 एसमधील ‘एस’ सूचक आहे. सिंपल, सबस्टन्स आणि स्पीड हे तीनही घटक दमदार आहेत.
* स्टार्ट-स्पॉट यंत्रणा असल्याप्रमाणेच याचे ट्विन टर्बो इंजिन अजिबात आवाज करत नाही.किंमत : ५ 3 कोटी