आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅडजस्टेबल ब्रेक्स टीएनटी ६०० आय, जीटी रेसिंग बाइक्सचे वैशिष्ट्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
*भारतात दुचाकींचा बाजार अथांग समुद्रासारखा झाला आहे. ६०० सीसीच्या रेंजमधील बाइक कंपनी बाजारात आणत आहे. बाइक दोन श्रेणींत आहेत. एक टीएनटी ६०० आय असून त्याची किंमत सव्वापाच लाख ते ५.५० लाख रुपये आहे. दुसरी टीएनटी ६०० जीटी आहे. याची किंमत ५.५७ लाख रुपयांच्या जवळपास आहे. याचा वेग जोरात वाढतो, त्यामुळे नवख्यांसाठी अशा पद्धतीच्या सुपरबाइक्स त्रासदायक ठरू शकतात.
*बाइक्सची चीनमध्ये निर्मिती करण्यात आली, मात्र त्याचे डिझाइन इटलीत तयार करण्यात आले. रेसिंगला सोयीचे व्हावे यासाठी फ्यूएल टँक सपाट आहे. बाइकचा मागील भागही वेगळा आहे. ६०० आयमध्ये आसनासोबत स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. गाडीत दिलेला टॅकोमीटर ही जुनी फॅशन आहे. यामध्ये अ‍ॅडजस्टेबल ब्रेक देण्यात आले आहेत. ब्रेक लिव्हर अ‍ॅडजस्ट केले जाऊ शकतात.
*दोन्ही प्रकारचे मॉडेल्स फोर स्ट्रोक असले, तरी वेगळा ट्यून देतात. ६०० आयचा विचार केल्यास त्याचा आवाज खूप मोठा आहे. जीटीमध्ये साउंड जेंटल आहे. दोन्हीमध्ये चार व्हॉल्व्हचे सिलिंडर आहेत. ६०० आयमध्ये टॉर्क रेट ११५०० आरपीएमचा आहे. ६०० जीटीमध्ये ते ८००० आरपीएम आहे.
*३० किमी प्रतितास वेगातही बाइक टॉप गिअरमध्ये आणता येते.
दोन्ही बाइक्स पुढील महिन्यात बाजारात येणार आहेत.
*दोन्ही मॉडेल्सची स्पर्धा कावासाकीशी होऊ शकते. या कंपनीची बाजारात आधीपासूनच पकड आहे. यासोबत निंजा ६५०ची दोन्ही मॉडेल्सशी स्पर्धा असेल.
*स्टाइलमध्ये वेगळेपण असण्यासोबत बाइक्सचे वजन भिन्न आहे. कर्ब वेटचा विचार केल्यास ६०० आयचे वजन २०८ किलो आहे. ६०० जीटीचे वजन १५ किलोने जास्त आहे. तिचे वजन २२३ किलो आहे. या व्यतिरिक्त दोन्ही बाइक्समध्ये गिअर बॉकस, इंजिन लेआऊट, डिस्प्लेसमेंट, पॉवर, फ्रँट आणि रिअर सस्पेंशन, ब्रेक्स, व्हील आदी फिचर एकसारखे आहेत.
किंमत:
रु. ५.५-५.७५ लाख
(अंदाजे)
डिजिटल आणि अ‍ॅनालॉग मिक्स असल्यामुळे क्लॉक टाइट दिसते.
गुड पॉइंट
*दोन्ही बाइक्स इनलाइन फोर इंजिन कॅरेक्टरयुक्त आहेत.
*जीटीची अपराइट रायडिंग पोझिशन आरामदायक आहे.
बॅड पॉइंट
*६०० आयच्या फ्रंटला चांगली स्टाइल देता येऊ शकत होती.
*दोन्ही बाइक्सवरील उपकरणे टच डेटेड आहेत. त्यात काही विशेष नाही.