आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दुचाकी: सुखद प्रवासासाठी दुकातीची मॉन्स्टर बाइक..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुकातीच्या बाइक्सला तोडच नाही. भारतीय रस्त्यांचा विचार करता दुकातीची मॉन्स्टर 1200 एस ही योग्य निवड ठरेल.
डिझाइन : उत्कृष्ट डिझाइन ही दुकातीची परंपराच राहिली आहे. याची प्रचिती मॉन्स्टर 1200 एस मध्येही येते. जुन्या मॉडेल्सपेक्षा ही थोडी लांबीने जास्त आहे. सीटच्या उंचीला 785 मिमी ते 810 मिमीपर्यंत सेट करता येते. यात आफ्टरमार्केट सीट असून 40 मिमीपर्यंत उंची कमी करता येते.
राइड : यात ट्रॅक्शन कंट्रोलच्या 8 पातळ्या आणि एबीएसचे 3 स्तर आहेत. मोड्सप्रमाणे हे विविध आहेत. प्रत्येक मोडला टीएफटी डॅशवर सिग्नेचर डिस्प्ले देण्यात आला आहे. उदाहरणार्थ - तुम्ही अर्बन मोडवर बाइक चालवत असाल तर स्पीडोमीटर सेंटर स्टेजवर असेल. टुरिंग मोडवर इंधनाची पातळी, तापमान इत्यादी माहिती दिसते. हँडल बारची रुंदी अधिक व सपाट आहे. त्यामुळे बाइकवर बसण्यास सोपे जाते. भारतीय रस्त्यांचा विचार करून बाइक बनवली गेली आहे. सुट्यांच्या काळात राइडला जाण्याचा आनंद देणारी ही बाइक आहे. 17.5 लिटर इंधन क्षमता आहे.
पॉवर : 1198 सीसी 8-व्हॉल्व्ह डेस्मोड्रोमिक इंजिन नव्या बाइकमध्ये आहे. मल्टिस्ट्राडा बाइकच्या इंजिनवर आधारित आहे.