आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Financial Activities By Chaitanya Wangikar, Divya Marathi

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पंधरवड्यातील घडामोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१. फेडरल रिझर्व्हतर्फे २०१५ च्या मध्यापर्यंत अमेरिका व्याज दर वाढवणार नसल्याचे घोषित
१७ सप्टेंबर रोजी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने २०१५ मध्यापर्यंत अमेरिका व्याज दर वाढवणार नसल्याचे घोषित केले. त्याचबरोबर ऑक्टोबर २०१४ च्या अखेरपर्यंत १५ अब्ज अमेरिकी डॉलरचा बाँड खरेदी कार्यक्रम बंद करण्याचे सूतोवाच फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेनेट येलेन यांनी केले. यामुळे परकीय गुंतवणूक येणारा काही काळ तरी भारतासारख्या विकसनशील देशात येईल, अशी अपेक्षा आहे.

2. भारतात जपानकडून ३५, तर चीनकडून
२० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतात २० अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणुकीची ग्वाही दिली. आयात-निर्यातीला चालना देण्यासाठी दोन्ही देशांत अनेक करार झाले. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीत बडोदा येथे कारखाने उभारण्यास चीन उत्सुक आहे. महाराष्ट्रातसुद्धा औद्योगिक पार्क उभारण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बाब आहे. काही दिवस आधीच जपानने ३५ अब्ज अमेरिकन डॉलर येणा-या पाच वर्षांत भारतात गुंतवणार असल्याची माहिती पंतप्रधानांच्या जपान दौ-यात दिली.

3. स्कॉटलंड नागरिकांनी पसंती दिल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आनंददायी वातावरण
युनायटेड किंगडममधून स्कॉटलंड वेगळे करण्यात यावे अशी मागणी स्कॉटलंडच्या काही नागरिकांची होती. त्याकरिता १८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमध्ये मतदान घेण्यात आले. ज्यात ५७% लोकांनी विभक्त होण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या या घटनेला महत्त्व होते. एखादा देश एका संघातून विभक्त झाल्यास त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो; परंतु स्कॉटलंडच्या नागरिकांनी एकत्र राहण्यास पसंती दिल्याने निश्चितच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आनंददायी वातावरण आहे.

4. मोदींच्या अमेरिकी दौ-यामुळे विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल, रुपयाची पत सुधारेल
२९ आणि ३० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात सुरक्षा आणि व्यापार या विषयांवर भारत आणि अमेरिकेत करार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे भारतात व्यापारवृद्धी होण्यास मदत होईल. भारतीय अर्थव्यवस्थेकरिता निश्चितच ही बाब सकारात्मक आहे. यामुळे भारतात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल आणि भारतीय रुपयाची पत सुधारेल.

5. विकास आणि महागाई रोखण्यासाठी आरबीआय कदाचित व्याजदर कमी करू शकते
३० सप्टेंबरला आरबीआय तिमाही पतधोरण जाहीर करेल. ऑगस्ट महिन्यात घाऊक आणि ग्राहक महागाई निर्देशांकामध्ये घट झाली. ३.७४% आणि ७.८% अशी आकडेवारी अनुक्रमे घाऊक आणि ग्राहक महागाई निर्देशांकाने दर्शविली. यामुळे आरबीआय कदाचित व्याज दर कमी करण्याचा विचार करू शकते. विकास आणि महागाई दर याचा समतोल राखण्याकरिता आरबीआय योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ९८ अमेरिकी डॉलर प्रति बॅरेल इतक्या खाली आल्या आहेत.
chaitanyavwangikar@gmail.com