आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप अप प्लॅनद्वारे वाढवता येते आरोग्य विम्याचे कवच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक ते तीन लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण बहुतेक सर्व जण घेतात. मात्र, उपचाराच्या वाढत्या खर्चाने महागाईला केव्हाच मागे टाकले आहे. अशात बेसिक कव्हर पुरेसे ठरत नाही. समजा एखादा गंभीर आजार झाला, हृदयविकाराचा झटका आला तर पाच ते सात लाख रुपये खर्च येतो. एखादी गंभीर दुखापत खिशाला मोठा खड्डा पाडू शकते. अशा स्थितीत तणावमुक्त राहण्यासाठी मोठ्या रकमेसह आरोग्य विमा संरक्षण असणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विम्याचे कवच वाढवण्यासाठी टॉप अप प्लॅन कसे उपयुक्त ठरतील या बाबत माहिती घेऊया...
टॉप अप आरोग्य विमा योजना म्हणजे काय? : सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, आरोग्य विमा प्लॅनवरील संरक्षण संपल्यानंतर टॉप अप प्लॅन सुरू होतो. याला विमा क्षेत्राच्या भाषेत डिडक्टिबल असे म्हणतात. डिडक्टिबल हा क्लेम रकमेचा असा भाग असतो ज्याचा भरणा विमाधारक करतो. डिडक्टिबल रक्कम कंपनीनिहाय एक ते पाच लाख रुपये असू शकतो. पूर्ण विमा संरक्षणाच्या तुलनेत टॉप अप स्वस्त असतात. यात खर्च कमी प्रमाणात लागतो. एका निश्चित रकमेनंतरचा भरणा टॉप अप प्लॅनद्वारे होतो.
कार्यपद्धती : यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा आरोग्य विमा संरक्षण तीन लाख रुपयांचे आहे आणि आठ लाखांचे टॉप अप घेतले आहे. आरोग्य विमा पॉलिसीची मर्यादा संपल्यानंतर टॉप-अप्स थ्रेशोल्ड लेव्हल अर्थात डिडक्टिबलसह घेतले जाईल. येथे विम्याची मर्यादा तीन लाख रुपये आहे. ही मर्यादा संपल्यानंतरच टॉप अप संरक्षण लागू होईल. समजा क्लेम पाच लाखांचा असेल तर बेस पॉलिसीतून तीन लाख रुपये मिळतील. उर्वरित दोन लाख रुपये टॉप अप पॉलिसीतून मिळतील. क्लेम 10 लाखांचा आहे असे समजू, बेस पॉलिसी मात्र तीन लाखांपर्यंतचा खर्च संरक्षित करते आहे. टॉप अप पॉलिसी पाच लाख रुपये देईल कारण एकूण विमा संरक्षण आठ लाखांचे आहे. अशा रीतीने दोन लाख रुपये खिशातून खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत एक सुपर टॉप अप पॉलिसी कामास येऊ शकते. थ्रेशोल्ड लिमिट पॉलिसी मुदतीत येणा-या एकूण खर्चावर लागू असते.
स्वस्त संरक्षण : खर्चाचा विचार करता नियमित आरोग्य विमा पॉलिसींच्या तुलनेत टॉप अप कव्हर स्वस्त पडते. समजा हेल्थ कव्हर दोन लाख रुपयांचे आहे. उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता हे कवच पुरेसे नाही. हे कवच पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे दोन पर्याय आहेत : 1. वेगळी आरोग्य विमा पॉलिसी (प्रीमियम 6000 रुपये वर्षाकाठी येऊ शकतो.) 2. विमा कंपनीला प्लॅनमध्ये पाच लाख रुपये वाढवण्याची विनंती करणे. दोन्ही पर्याय महागडे आहेत. मात्र, पाच लाख रुपयांच्या टॉप अप प्लॅनसाठी वर्षाकाठी 2000 रुपये लागतात. डिडक्टिबल जेवढे जास्त तेवढा टॉप अप कव्हर किफायतशीर. बेसिक कव्हर चांगले असेल तर हायर डिडक्टिबल निवडता येईल.
कोणी खरेदी करावे : जास्त खर्च न वाढवता आरोग्य विमा कवच वाढवण्यासाठी टॉप अप अत्यंत उपयुक्त आहेत. डिडक्टिबल बेस पॉलिसीच्या सम इन्शुअर्ड रकमेपेक्षा कमी किंवा समान असावे किंवा त्यातच बेस पॉलिसीची सम इन्शुअर्ड रक्कम संरक्षित असावी. एकूणच आर्थिक नियोजनाच्या पातळीवर मोठ्या रकमेचे टॉप अप घेण्याबाबत विचार होऊ शकतो. बेस कव्हर कमी असेल तर चांगल्या रकमेचे टॉप घेणे केव्हाही चांगले. समजा कंपनी किंवा नियोक्त्याकडून आरोग्य विमा संरक्षण मिळत असेल तर ते वाढवणे आणि अतिरिक्त संरक्षणासाठी टॉप अप करणे उत्तम पर्याय आहे. समजा नियोक्ता काहीच संरक्षण देत नसेल तरीही टॉप अप कव्हर बेस पॉलिसी किंवा सामान्य विमा योजेनेनुसार कार्य करतो.
विचारपूर्वक खरेदी : सध्याची पॉलिसी आणि प्रत्यक्षातील खर्च यातील फरक टॉप अपमुळे कमी होतो. येथे डुप्लिकेट पॉलिसी घेण्याचा प्रश्न नसून की खर्चात जास्त संरक्षण घेण्याचा प्रयत्न आहे. आजारांसाठीचे डिडक्टिबल क्रायटेरिया, आधीपासूनच्या आजारांसाठीचा प्रतीक्षा कालावधी, डोनरच्या खर्चाची मर्यादा, रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचा आणि झाल्यानंतरचा खर्च आदी बाबी तपासा. एकाच वेळी उपचाराचा खर्च मर्यादा ओलांडल्यानंतर हे लागू होते. अशा स्थितीत थ्रेशोल्ड किंवा डिडक्टिबल लिमिट माहिती असणे आवश्यक असते.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
suresh.narula@dainikbhaskargroup.com