आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Home Loan By Adil Shetty, Divya Marathi

गृहकर्जाची रक्कम पुरेशी नसल्यास पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजेशने मोठ्या महत्प्रयासानंतर 50 लाख रुपयांचे एक घर पसंत केले. ते त्याच्या खरेदीच्या तयारीला लागले. दरम्यान, बँकेकडून केवळ 40 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज मिळणार असल्याचे त्यांना समजले. त्यांनी संकटकाळात मदत व्हावी यासाठी पाच लाख रुपये जमा केले होते. या रकमेचा वापर केला तरी त्यांना पाच लाख रुपये कमी पडत होते. ही अडचण एकट्या राजेशची नाही. अनेकांना अशा प्रकारच्या समस्येला समोर जावे लागते. आता प्रश्न असा आहे, की कमी पडणा-या पैशांची व्यवस्था कशी करता येईल? आता आपण कर्जाच्या संभाव्य पर्यायांबाबत माहिती घेऊ...


पर्सनल लोन : पैशांची गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन किंवा वैयक्तिक कर्ज हा सहज, सोपा पर्याय आहे. ग्राहकांची क्रेडिट रेटिंग आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या तपासणीनंतर बँका अशा स्वरूपाचे कर्ज देतात. मात्र, गृहकर्ज आधीच घेतले असेल आणि ते उच्चतम मर्यादेपर्यंत असेल तर पर्सनल लोनच्या रूपात जास्त रक्कम मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे बँकेकडून होमलोनची रक्कम हाती येण्यापूर्वीच पर्सनल लोनसाठी अर्ज करावा. अशा प्रकारच्या कर्जासाठी जास्त कागदपत्रे लागतच नाहीत. त्यामुळे हे कर्ज लवकर मंजूर होते. या कर्जाचा कालावधी एक ते 10 वर्षे असू शकतो आणि व्याजदर 15 ते 25 टक्क्यांदरम्यान असतात.


सोने तारण कर्ज : प्रत्येक कुटुंबाकडे सोने किंवा त्याचे दागिने असतातच. ते तारण ठेवून गोल्ड लोन किंवा सोने तारण कर्ज मिळू शकते. पर्सनल लोनच्या तुलनेत याचे व्याजदर कमी असतात. बँक आणि बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) अशा स्वरुपाचे कर्ज देतात. त्या अंतर्गत सोन्याच्या किमतीच्या 80 टक्क्यांइतके कर्ज काही दिवसांत मंजूर होऊ शकते. या कर्जाचा कालावधी 1 ते 3 वर्षे असू शकतो आणि व्याज दर 12 ते 15 टक्क्यांदरम्यान असतात.
पीपीएफवर कर्ज : तुम्ही जर तीन वर्षांपासून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (पीपीएफ) गुंतवणूक करत असाल तर आपल्या पीपीएफ खात्यात जमा रकमेइतके कर्ज मिळू शकते. पीपीएफ तिस-या ते सहाव्या वर्षांदरम्यान जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी कर्ज मिळू शकते. त्याचे व्याजदर सध्याच्या व्याजदरांपेक्षा 1 ते 2 टक्के जास्त असते.
मुदत ठेवींवर कर्ज : आपत्कालीन स्थिती बँकेतील मुदत ठेवींवर (एफडी) कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय आहे. एफडीच्या रकमेच्या 70 ते 80 टक्क्यांइतकी रक्कम बँकेकडून कर्जापोटी मिळते. या कर्जावर एफडीच्या व्याजदराच्या 1 ते 2 टक्के जास्त व्याज लागते. एफडीच्या परिपक्वता कालावधीपर्यंत हे कर्ज मिळते.


सिक्युरिटीजवर कर्ज : विमा पॉलिसी -एफडीप्रमाणे म्युच्युअल फंड, शेअर्स यांसारख्या सिक्युरिटीजवरही कर्ज मिळू शकते. कोणत्या फंडावर, शेअर्सवर कर्ज मिळू शकते याची एक यादी संबंधित बँकेकडे असते. प्रारंभी अशा स्वरूपाच्या कर्जाचा कालावधी एक वर्षाचा असतो. नंतर तो वाढवता येतो. संबंधित साधनाशी असलेली जोखीम लक्षात घेऊन 9 ते 13 टक्के व्याज आकारले जाते. अशा प्रकारच्या कर्जाबाबत संबंधित बँकेकडे चौकशी करावी.


ब्रिज लोन : नव्या घराच्या खरेदीसाठी जुने घर विकण्याचा विचार असेल तर त्यावर कर्ज घेणे -ब्रिज लोन हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जोपर्यंत जुने घर विक्री होत नाही तोपर्यंत डाउन पेमेंटसाठी या कर्जाचा वापर होऊ शकतो. ब्रिज लोन जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षे आणि व्याजदर 14 ते 18 टक्क्यांदरम्यान असतात.


लेखक bankbazaar.comचे सीईओ आहेत.