आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Income Tax Audit And Returns By Chetan Agrawal, Divya Marathi

आयकर ऑडिट आणि रिटर्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांनो, आयकर कायदा, १९६१ च्या कलम ४४ एबी प्रमाणे ज्या करदात्यांचे आर्थिक वर्ष २०१३-२०१४ मध्ये उलाढाल १ कोटी (व्यावसायिकांसाठी २५ लाख) किंवा त्यापेक्षा अधिक असेल, त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटकडून लेखापरीक्षण (ऑडिट) करून घेणे आवश्यक आहे. सामान्यत: ऑडिट करून रिपोर्ट सादर करण्याची आणि आयकर रिटर्न भरण्याची मुदत ३० सप्टेंबर असते. परंतु, या वर्षी सरकारने वर्ष संपल्यानंतर चार महनि्यांनी ऑडिट रिपोर्टमध्ये बदल केला आणि ऑगस्ट संपेपर्यंत नवीन रिपोर्टचा फॉर्म तयार झाला नसल्याने ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची मुदत ३० नोव्हेंबर केली. पण, रिटर्न ३० सप्टेंबरपर्यंतच भरावे लागेल. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी,

सर्व करदात्यांनी त्याचे रिटर्न ३० सप्टेंबरला किंवा त्याआधी भरावे.
१)- सर्व कलम ४३ बी अंतर्गत समाविष्ट असलेले वैधानिक खर्च जे देणे बाकी आहे, ते करदात्याने ३० सप्टेंबरपर्यंत भरणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची वजावट मिळणार नाही.
- जर रिटर्न दुरुस्त करायचे असेल, तर ते मुदतीत भरले असले पाहिजे.
- जर ऑडिट रिपोर्टमध्ये काही बदल असेल, तर त्यानुसार करदाता भरलेले रिटर्न दुरुस्त करू शकतो.
- या वेळेस करदात्यांनी रिटर्न भरण्याची मुदत वाढेल या अपेक्षेत राहून रिटर्न भरण्यास उशीर करू नये.
2) पहिल्या तिमाहीचे टी.डी.एस. रिटर्न नील असेल तर : -
ज्या करदात्यांनी पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०१४) या कालावधीत कोणतीही स्रोतातून करकपात (टी.डी.एस.) केली नसेल, तर त्यांना नील चे रिटर्न भरणे आवश्यक नाही. त्यांनी फक्त टी.डी.एस. च्या संकेतस्थळावर जाऊन एक डिक्लेरेशन फाइल करायचे आहे. जर करदात्याने डिक्लेरेशन फाइल केले, तर त्याला टी.डी.एस. रिटर्न भरणे आवश्यक नाही, असा अर्थ होतो. आणि त्याला रिटर्न न दाखल केल्याची नोटीसही येणार नाही.
3) टी.डी.एस. भरणा
करण्यातील बदल -
टी.डी.एस. चे चलन भरणा करण्यात काही बदल केलेले आहे. एक किंवा एकापेक्षा अधिक कलमअंतर्गत आता एकच चलन भरले तरी चालेल. जसे, व्याजावर आणि भाड्यावर करकपात केली, तर आधी प्रत्येक कलम साठी वेगवेगळे असे दोन चलन भरावे लागायचे. आता सर्व मिळून एक जरी चलन भरले तरी चालेल. यामुळे बहुतेक चुका टळतील आणि करदात्यांसाठी हे एक चांगले पाऊल आहे. एक किंवा अधिक आर्थिक वर्षांसाठी एकच चलन भरले तरी चालेल. आधी प्रत्येक चलन हे एका विशिष्ट आर्थिक वर्षासाठीच असायचे. यामुळे अनेक नोटीसेस येणे आणि त्यासाठी हाेणारा खर्च मानसिक त्रास आणि वेळ वाचेल. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, वेगवेगळे डिडक्टर एकाच टँनखाली नोंदलेले असतील, तर त्यांचे सर्वांचे मिळून एकच चलन भरू शकतात.
4) अंतिम मुदत : -
कंपनी करदात्यांसाठी अग्रिम कराचा दुसरा हप्ता भरण्याची १५ सप्टेंबर ही मुदत आहे. कंपनी सोडून इतर करदात्यांसाठी अग्रिम कराचा पहिला हप्ता भरण्याची १५ सप्टेंबर ही मुदत आहे. ही तरतूद ज्या करदात्यांचे कर १०,०००/- किंवा अधिक येत असेल, त्यांना लागू आहे. एकूण निर्धारित कराच्या ३०% रक्कम करदात्याने भरून दिली पाहिजे.
5) विचारधारा : -
श्री. नानी पालखीवाला यांनी १९८४ च्या फायनान्स अॅक्टमध्ये जेव्हा आयकर कायद्यात ऑडिट सुरू झाले, तेव्हा सांगितले, की, सरकारने जो अकाउंटंसी व्यवसायावर विश्वास दाखवला आहे, ही जगात एक अद्वितीय बाब आहे. कंपनी, व्यापारांमध्ये हिशोब ठेवण्याच्या कामात शिस्त येईल आणि खात्याद्वारे केली जाणारी असेसमेंट प्रक्रिया साधी अणि सोपी होईल.

(लेखक सी.ए. आहेत)