आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात उत्पादित झालेली पहिली स्पोर्टस कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाचा भारतात तयार झालेल्या स्पोर्टस कारविषयी...
-प्रथमच भारतात उत्पादित झालेली स्पोर्ट्स कार सादर होत आहे. डीसी अवंती ही आत इंजिन असलेली पहिली कार
आहे. ही कार हॅचबॅक आहे. सॅलून व स्पोर्ट्स कारपण आहे. या कारची टेस्टिंग पुण्याजवळ डोंगराळ भागात झाली.
-घाटाच्या रस्त्यात कार थांबलीच तर पूर्ण रस्ता ब्लॉक होतो, इतकी ही कार रुंद आहे. यात बसायला जागा ऐसपैस
आहे. मात्र रूफ हाइट जास्त नसल्याने ६ फुटांपेक्षा जास्त उंचीचा माणूस आरामात बसू शकत नाही.
-कार अद्याप संंपूर्णरीत्या तयार झालेली नाही. याच्या इंटेरिअरचे काम अद्याप सुरू आहे. मात्र, कार अत्यंत आकर्षक
आहे. एक्स्टेरिअरवर नजर टाकली तर यात ब-याच नव्या अ‍ॅक्सेसरीज दिसून येतात.
-कारमध्ये २० इंची व्हील्स लावण्यात आले आहेत. लांबच्या प्रवासासाठी ही कार योग्य नाही. कोनी स्ट्रटचे सस्पेन्शन
लावण्यात आले आहेत.
-निर्माता कंपनी डीसीने व्हील्स इंडियाकडून अलॉय व्हील्स घेतले आहेत. मात्र, यात बदल होण्याची शक्यता आहे.
-कारचे ग्राउंड क्लिअरन्स १७० मिमीचे आहे. हे भारतीय रस्त्यांसाठी पुरेसे आहे. प्रत्येक व्हीलमध्ये इंग्रजी ए अक्षराच्या
आकाराचे सस्पेन्शन दिले आहेत.
-मागच्या बाजूने येणारी वाहने व्यवस्थित दिसत नसल्याची मुख्य समस्या या डिझाइनची आहे. रिअर विंडो खूप छोटी
आहे. रिव्हर्सिंग कॅमे-यावर तुम्हाला अवलंबून राहावे लागते.
- बाजारात उतरवताना कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल देण्यात येतील. यात आयपॅड असेल. काही नव्या फीचर्सची
माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
किंमत :
~ ३५ लाख (एक्स-शोरूम, मुंबई)