आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांचे भवितव्य उज्ज्वल असावे असे प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते. मात्र, शिक्षणाचा वाढता खर्च आणि उत्पन्नाची मर्यादा यामुळे त्यांची काळजी वाढते. गुंतवणुकीबाबत बहुतेक पालक संभ्रमात असतात. त्यामुळे चुकीची उत्पादने त्यांच्या गळी पडतात. गरजेनुसार गुंतवणूक होत नाही. त्यामुळेच मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी गुंतवणुकीची साधनांबाबत माहिती देत आहोत.
त्यामुळे गुंतवणुकीचा मूळ हेतूच दूर राहतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या विविध साधनांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. गुंतवणूक चुकीच्या साधनात होऊ नये आणि हेतू साध्य व्हावा यासाठीही ही माहिती उपयोगी ठरते. त्यामुळेच मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी गुंतवणुकीची साधनांबाबत माहिती देत आहोत.
विमा
मुलांसाठीच्या विमा योजना गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. गुंतवणुकीबरोबरच विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणारी विमा रक्कम हे या योजनांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मात्र, इतर साधनांचा विचार केल्यास विमा पर्याय थोडा महागडा आहे. पारंपरिक विमा योजना आकर्षक परतावा देत नाहीत आणि युलिप हा मोठा चर्चेचा विषय आहे. युलिपमध्ये खर्च अधिक आहे आणि चांगल्या परताव्यासाठी त्यात दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. तसेच गुंतवणूक रकमेचे व्यवस्थापन हेही युलिपमध्ये कळीचे ठरते. यात गुंतवणूक करण्यापूर्वी युलिप योजनेचे योग्य विश्लेषण करायला हवे. याद्वारे आपल्या गरजा कितपत पूर्ण होतात हे पाहणे गरजेचे ठरते. याची इतर साधनांशी तुलना करून निर्णय घ्यावा. विमा आणि गुंतवणूक यांना वेगळे ठेवल्यास उत्तम.
पुढे वाचा म्युच्युअल फंडाविषयी...........
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.