प्राचीन काळापासूनच सोने आणि स्थावर मालमत्ता हे गुंतवणुकीचे सर्वात पसंतीचे पर्याय राहिले आहेत. पारंपरिकरीत्या, सोन्याच्या दागिन्यांद्वारे गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा प्राप्त केला जातो, म्हणूनच या पिवळ्या धातूला गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. पण काळानुरूप, गुंतवणूकदारांचा रोख आता हि-याकडे वळला आहे. गुंतवणूकदारांनी चलनवाढीमुळे हेजिंग आणि कमी व्यवस्थापन म्हणून हि-यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. गुंतवणुकीमध्ये हिरा हा एक नवीन सुवर्ण मानक बनला आहे. हि-यात गुंतवणूक केल्यानंतर मिळालेल्या परताव्याने आतापर्यंत गेल्या पाच वर्षांमध्ये समभाग आणि सोन्यातून मिळणा-या परताव्याला मागे टाकले आहे. जास्तीत-जास्त श्रीमंत गुंतवणूकदार आता या बहुमूल्य रत्नाला प्राधान्य देत आहेत.
१) हिरा खरेदी करतेवेळी लोकांच्या
मनात पहिल्यांदा येणा-या गोष्टी
हिरा खरा आहे की नकली : हिरा खरा आहे की नकली हे जाणून घेण्याकरिता माहिती किंवा मापदंडांच्या अभावामुळे लोक खरेदी करताना कचरत होते.
किंमत : हि-याच्या किमतीमध्ये पारदर्शकता नव्हती, हि-याला पहिल्यांदा विलासीपणाची वस्तू म्हणून पाहिले जात होते.
ज्योतिषसंबंधित बाबी : हि-यात गुंतवणूक करण्याअगोदर यामध्ये ज्योतिष संबंधित तर कोणती बाब नाही ना याची खातरजमा ग्राहक करत होते.
अ. चोरी : ही लक्झरी वस्तू मानले जात होते, म्हणूनच ती चोरी होण्याची शंकाही जास्त होती.
ब. लायबिलिटी (दायित्व) : पहिल्यांदा हि-यावर खर्च करण्याला गुंतवणूक किंवा
संपत्तीच्या तुलनेत लायबिलिटी अधिक मानले जात होते. तथापि, बाजारामध्ये विश्वासार्ह डायमंड ब्रँड्सच्या प्रवेशामुळे आता या दृश्यात्मकतेत परिवर्तन आले आहे. सजग ग्राहक खरेदीचा योग्य निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहेत. त्यामुळे हि-याला आता उत्कृष्ट गुंतवणूक पर्याय म्हणून गणले जात आहे. भविष्यातील िचत्र बघून आता अधिक किंमत द्यायला देखील ग्राहक तयार आहेत. सध्याच्या काळामध्ये, हिरे सहजतेने वाहून नेण्याच्या वृत्तीमुळे सोन्याच्या तुलनेत जास्त सुरक्षित मानले जात आहेत. एकीकडे, सोन्याच्या किमती विविध कारणांनी प्रभावित होत आहेत, तर हि-यांच्या किमती वास्तविक आहेत आणि त्यांमध्ये वाढ होतच आहे. तसेच ग्राहकाला खरे मूल्य प्रदान करते.
२) हिरे कमोडिटी व ब्रँडिंगबाबत लोक जागरूक
प्रारंभिक स्थितीत, गुंतवणूक पर्याय म्हणून हि-यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे आणि याला प्राप्त करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग हि-याचे ‘कमोडिटी’करण करणे हा आहे. सुरुवातीला, लोकांकरिता माहितीचा अभाव व मानक पद्धतींच्या अनुपस्थितीत हिरे खरेदी करणे नेहमी असहज होते, पण आता लोकांद्वारे हि-यामध्ये अधिक गुंतवणूक केली जात आहे. ते हि-याच्या माहितीबाबत स्वत:ला अधिकाधिक शिक्षित करत आहेत आणि ब्रँडच्या बाबतही बरेच सजग झाले आहेत.
हिरे दुपटीने म्हणजे १०० टक्क्यांनी वाढले
>२०१० वर्षापासून बीएसई सेन्सेक्स आणि सोन्याच्या किमतींमध्ये अनुक्रमे ६८ टक्के आणि ७० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे, तर त्याच कालावधीमध्ये उच्च गुणवत्तेच्या सॉलिटेयरच्या एक कॅरेटची किंमत २ लाखांनी वाढून ४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. ते देखील कोणत्याही मोठ्या चढ-उताराशिवाय. त्यामुळे एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून हि-याकडे बघितले जात आहे.
>दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी लूज व प्रमाणित हिरे खरेदी करणे हा समंजस विकल्प आहे. ते साठविणे, वाहून नेणे आणि सांभाळणे सोपे असते. त्यांच्याकरिता तुलनात्मकरीत्या तरल बाजार देखील आहेत. गुंतवणूक म्हणून हि-याकडे कल दाखविणारी काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.
> ब्रँड्सद्वारे बाजारामध्ये पारदर्शक किमती आणल्यामुळे हि-याचे वास्तविक मूल्य जाणून घेता येऊ शकते.
गुंतवणूक व लाइफस्टाइल क्योशंट
खरेदीच्या दरम्यान ग्राहकांचा विश्वास वाढविण्याकरिता प्रतिष्ठित संस्थेद्वारे हि-यांकरिता प्रमाणन चलनवाढीच्या विरुद्ध सुरक्षा.