आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटार विमा घेताय, मग हे जाणून घ्या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्हाला विचारा, स्वत:साठी सर्वोत्तम डील “कशाप्रकारे’’ मिळवावी? तुम्हाला एका इन्शुरन्स पॉलिसीची ऑफर देत असलेल्या कंपनीविषयी तुम्ही सविस्तर चेकअप करणे आवश्यक आहे. कंपनीसह करार करण्यापूर्वी आणि त्यांची इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यापूर्वी कंपनीची मूल्ये, आचारसंहिता व विविध इतर घटक जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

एजंट योग्यप्रकारे निवड करा
जर तुम्ही एजंटद्वारे पॉलिसी खरेदी करत असाल, तर अशा एजंटची निवड करा, ज्याच्याशी तुमची जवळीक आहे आणि ज्याच्याजवळ अधिकारपत्र आहे. एजंट हे इन्शुरन्स मार्केटमधील महत्त्वाचे मध्यस्थी आहेत आणि एक चांगला एजंट तुम्हाला कठीणप्रसंगी बहुमूल्य मदत करू शकतो.

कंपनीचा इतिहास
कंपनीचा इतिहास हा नेहमी दीर्घकालीन अस्तित्वापासूनच असला पाहिजे असे नाही, तर दावेदारांना देण्यात आलेल्या क्लेम्सच्या इतिहासावरून ठरवावा. यामध्ये कार्याचा इतिहास, सेवा दिलेल्या ग्राहकांची संख्या आणि ग्राहकांवर अर्थपूर्ण प्रभाव असलेले इतर घटक यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त इन्शुरन्स कंपनीचे कायदेशीर पैलू, विचारलेल्या क्लेम्सची संख्या, तसेच देण्यात आलेल्या क्लेम्सची संख्या याबाबत तपासणी करा. जर तुम्ही ब्रँडविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते.

योग्य प्रकारे संशोधन
तुम्ही निवडलेल्या विमा कंपनीमध्ये याआधीच खरेदी केलेल्या पॉलिसीधारक ग्राहकांचे मत जाणण्यासाठी वर्ल्ड वाइड वेबवर संपर्क साधू शकता. आजच्या काळात ग्राहक वेबसाइटद्वारे आपले मत व अनुभव प्रकट करण्यास नेहमीच अग्रेसर असतात. पण एकदा, सावधानतेचा इशारा, जर तुम्हाला एखादे वाईट मत दिसले, तर भावनावश न होणे, हेच उत्तम आहे. चर्चा सभेचा शोध घेण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला चुकीची माहिती न मिळता योग्य मार्गदर्शन मिळेल. लोकांच्या अनुभवाचे बोल ऐका, पण अंतिम निर्णय हा तुमचाच असला पाहिजे.

ग्राहक सेवा
इन्शु्रन्स कंपनी काटेकोरपणे ग्राहक सेवा देत असली, तरीदेखील स्वत:हून विश्लेषण करणे हे चांगले. कारण काही वेळा कंपनीकडून अतिरिक्त चुकीची माहितीदेखील पुरविली जाते. जर तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांची यादी तयार केली असेल, तर त्यांच्या ग्राहक सेवेला कॉल करा. उत्पादने, क्लेम्स प्रक्रिया यावर प्रश्न विचारा. भरपूर माहिती मिळेल.

उत्पादन उपलब्धता
कार इन्शुरन्स उत्पादने ही सामान्यत: इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये समानच असतात. त्यांच्यामधील फरक कसे ओळखाल? एक मजेशीर फरक म्हणजे उपलब्ध असलेल्या अ‍ॅड ऑन कव्हर्सची विविधता होय. याचा अर्थ असा की, कार इन्शुरन्स कंपनी तुम्हाला वेगवेगळ्या स्थितीची ऑफर देते, ज्यामुळे तुम्हाला योग्य संयोजन ओळखण्यास मदत होते.
(लेखक हे रिटेल बिझनेस, लिबर्टी, व्हिडिओकॉन जनरल इन्शुरन्समध्ये कंट्री हेड आहेत)