आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Automobile: अ‍ॅडव्हान्स फीचर्सच्या नव्या बाइक्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या बाइक्स लाँच करताना युवकांच्या पसंतीकडे कंपन्या विशेष लक्ष देत आहेत. आज अशा यूथफुल बाइक्सविषयी जाणून घ्या. तसेच देशात निर्मित पहिल्या स्पोर्टस कारविषयी जाणून घ्या...

हर्ले डेव्हिडसनची मेगा ट्रायो
हर्ले डेव्हिडसनने भारतासाठी तीन प्रीमियम क्रुझर लाँच केल्या आहेत. द सॉफ्टटेल ब्रेकआउट, स्ट्रीट ग्लाइड स्पेशल व सीव्हीओ लिमिटेड या तीन बाइक्सचे डिझाइन्स क्लासिक आहेत. द ब्रेकआउटची किंमत १६.२८ लाख, द स्ट्रीट ग्लाइड स्पेशलची किंमत २९.७० लाख रुपये आहे.
यात स्पीकर आणि बिल्ट-इन जीपीएस सिस्टिम आहे.

कावासाकीच्या दोन मोटरबाइक
कावासाकीच्या नवी झेड २५० आणि ईआर-६ एन बाइक आता भारतात उपलब्ध झाल्या आहेत. झेड २५० मध्ये २४९ सीसी, फोर-स्ट्रोक, लिक्विड कूल्ड, ट्विन पॅरलल इंजिन आहे. यात फ्युएल इंजेक्शन सिस्टिम आणि ड्युएल थ्रोटल व्हॉल्व्ह टेक्नॉलॉजीने इंधन बचत करणे शक्य होते. बाइकची किंमत २.९९ लाख रुपये आहे. ईआर-६एन मध्ये ६४९ सीसी, लिक्विड कूल्ड, फोर-स्ट्रोक युनिट आहे. याची किंमत ४.७८ लाख रुपये आहे.