आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Online Shopping By Venugopal Dhoot, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन दिवाळी धमाका सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दसरा-दिवाळीच्या निमित्ताने होणारी खरेदी लक्षात घेऊन ऑनलाइन रिटेलर्स नवी उत्पादने, नव्या सवलत योजना आणि विविध प्रकारच्या स्पर्धा यांचा जंगी दिवाळी धमाका घेऊन येत आहेत. नव्यानेच या क्षेत्रात उतरलेल्या फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन डॉट कॉमपासून ऑनलाइन खरेदीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या फॅबफर्निश, ब्ल्यू स्टोनपर्यंत सर्वच दिवाळीत ग्राहकांना आकर्षित करण्यात धडपडताहेत. हा लेख प्रसिद्ध होतानाच दिवाळीची ही आतषबाजी सुरू झाली असेल.

मॅत्रा हे फॅशन पोर्टल तर ५ हजार नवी उत्पादने घेऊन दिवाळीच्या या स्पर्धेमध्ये उतरत आहे : एफसीयूके, यूसीबी, ईएलएलई, सुपर ड्राय बिबा, फॅब इंडिया आणि अ‍ॅन्टोनी मोरॅटो अशा कंपन्यांची उत्पादने पहिल्यांदाच मॅत्राच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदीदारांना उपलब्ध होतील. स्नॅपडील डॉट कॉम, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, होम प्रॉडक्ट्स अशी भली मोठी रेंज घेऊन दिवाळीला सामोरे जात आहे. ऑनलाइन क्षेत्रातील मार्केट लीडर असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या दिवाळी योजना अद्याप उघड केल्या नसल्या, तरी या साइटवर मोठ्या सवलतींची खैरात केली जाणार आहे, असे कळते.

बहुसंख्य रिटेलर्स वर्षभर नवनवी उत्पादने तयार करीत असतात, ती खास या हंगामासाठी : ऑनलाइन रिटेलर्सच्या दृष्टीने दसरा-दिवाळीचा हंगाम हा सर्वात मोठा हंगाम असतो. बहुसंख्य रिटेलर्स वर्षभर नवनवी उत्पादने तयार करीत असतात, ती खास या हंगामासाठी. वर्षभरातील एकूण विक्रीपैकी ३० टक्क्यांहून अधिक विक्री केवळ या महिनाभराच्या काळात होते. दिवाळीच्या निमित्ताने ऑनलाइन खरेदी करणारा ग्राहक पुढे वर्षभर कायम राहतो, असा बहुतेकांचा अनुभव आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात अधिकाधिक ग्राहकांनी पहिल्यांदा ऑनलाइन खरेदी करावी, असा या सर्व कंपन्यांचा प्रयत्न असतो. दिवाळीच्या दृष्टिकोनातून मॅत्राने एक स्वतंत्र खास दिवाळी स्टोअर आपल्या साइटवर सुरू करण्याचे ठरवले आहे. दसरा-दिवाळीत येणारी प्रचंड मागणी लक्षात घेऊन या वस्तू तातडीने ग्राहकांना पुरवण्यासाठी त्यांनी दिल्लीजवळ गुडगाव येथे नवे गोदामच सुरू केले आहे.

ब्ल्यू स्टोन कंपनीचे यंदा दिवाळी जाहिरातींसाठी सहा हजार कोटी
दिवाळी धमाका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून या सर्वच कंपन्या ऑनलाइन आणि ऑफलाइन जाहिरातींवर प्रचंड खर्च करणार आहेत. सुवर्णालंकार, हिरे-मोत्यांसाठी प्रसिद्ध ब्ल्यू स्टोन या एकाच कंपनीने दिवाळी जाहिरातींसाठी सहा हजार कोटी खर्च करण्याचे ठरवलेय. यावरून या क्षेत्रातला दिवाळी बिझनेस किती प्रचंड असेल, याची कल्पना येते. अलंकारांच्या विक्रीसह ब्ल्यू स्टोनने नवी कन्सल्टन्सी सेवाही सुरू केलीय. यात हे दागिने वापरणा-यांचा चेहरा, हेअरस्टाइल व संभाव्य पोशाखास कोणते दागिने खुलून दिसतील, याचे मार्गदर्शनही तज्ज्ञ या ऑनलाइन सेवेत करतील. अशी ऑनलाइन सेवा प्रथमच सुरू होत आहे.

मोबाइलवरून मागण्या वाढल्या
ऑनलाइन खरेदीत केवळ घरी संगणकवालेे ग्राहकच महत्त्वाचे राहिले नाहीत, तर मोबाइलवरून मागण्या नोंदवणा-यांची संख्या वेगाने वाढते आहे. ‘पेटिम’ ही ऑनलाइन कंपनी तर फक्त मोबाइलवरच आपल्या वस्तूंची विक्री करते. या वर्षी त्यांचा भर फॅशन आणि घर सजावटीच्या वस्तूंवर राहणार आहे. दिवाळीच्या महिनाभराच्या काळात मोबाइलवरून १०० कोटींच्या विक्रीचा अंदाज आहे. महानगरांबरोबरच दुस-या, तिस-या श्रेणीतील शहरांमधूनही या वेळी ऑनलाइन आणि मोबाइलच्या माध्यमातून मोठी मागणी येईल, असा सर्वच कंपन्यांचा अंदाज आहे.
अ‍ॅमेझॉन डॉट कॉम खास दिवाळीच्या निमित्ताने नवी उत्पादने तर सादर करणार आहेच, पण त्याबरोबर दसरा-दिवाळीसाठी खास भेटवस्तूंचे एक स्वतंत्र दालन त्वरित िडलिव्हरीसाटी अ‍ॅमेझॉन विमानसेवेची मदत घेणार ऑनलाइन खरेदी करणा-यांना तातडीने आपला माल पोहोचावा, यासाठी अ‍ॅमेझॉन विमानसेवेची मदत घेणार असून त्याला त्यांनी ‘ड्रोन डिलिव्हरी’ असे नाव दिले आहे. जबाँग डॉट कॉमने एकाच दिवशी १ लाख ऑर्डर्स नोंदविण्याचा विक्रम यापूर्वीच केला आहे. आता त्यांची तयारी आपलाच हा विक्रम मोडण्याच्या दिशेने सुरू आहे. या दिवाळीत सर्वांचीच अपेक्षा विक्रीमध्ये ४० टक्के वाढ होईल, अशी आहे. ऑनलाइन रिटेलर्स तर तयार आहेत. तुम्ही पण तयार आहात ना?

फ्लिपकार्टची दिवाळी हंगामात एकाच दिवशी सर्वात मोठी विक्री करण्याच्या दृष्टीने तयारी
फ्लिपकार्टने दिवाळी हंगामामध्ये एकाच दिवशी सर्वात मोठी विक्री करण्याच्या दृष्टीने तयारी चालविली आहे. हंगामाच्या महिनाभरात दर आठवड्याला एक नवा भागीदार बरोबर घेऊन त्याची सर्व उत्पादने फ्लिपकार्टवर उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे फ्लिपकार्टवर एरवी उपलब्ध नसलेली नामवंत कंपन्यांची हजारो उत्पादने दिवाळीत आपल्या भेटीला येतील. दिवाळीच्या आधी एक दिवस फ्लिपकार्टच्या सर्व उत्पादनांवर सर्वात मोठी सवलत जाहीर केली जाईल आणि एकाच दिवशी सर्वाधिक विक्रीचा उच्चांक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.