आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीचा मार्ग तुम्हीच करा निश्चित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स (डीडीटी) संपूर्णत: काढून टाकणे आणि दीर्घकालीन भांडवली नफा कराच्या जाळ्यातून मुक्त केल्याशिवाय भांडवल बाजार वाढेल असे वाटत नाही. व्याजदर किमान 2/3 टक्के कमी करण्याची गरज आहे, परंतु तशी शक्यता सध्यातरी वाटत नाही. आर्थिक विकासाची गाडी रुळावर आहे अशा घोषणा होताहेत, परंतु वास्तव परिस्थिती वेगळी आहे. पुढील 1-2 वर्षांसाठी गुंतवणूक शक्यतो मासिक उत्पन्न योजना, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन, डेब्ट फंड किंवा चांगल्या मुदत ठेवींच्या योजनांमध्येच करावी आणि मिळालेल्या व्याजात दरमहा एसआयपी करावी.
होळी जवळ आल्याने आता हवेतला उष्मा वाढतो आहे. कदाचित सार्वत्रिक निवडणुका, भ्रष्टाचार, घोटाळे, यूपीए-2 सरकारमधील घटकपक्षांचे दबावाचे राजकारण, महागाई, गुंतवणूकदारांची विमनस्क अवस्था, अमेरिका व युरोपियन देशसुद्धा मंदीची होळी खेळताहेत. भारतातील राज्यकर्ते अर्थव्यवस्था बिघडवून मंदीची होळी खेळण्यास उत्सुक आहेत. सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांवर राजकीय होळ्या आपण बघतच आहोत आणि अशा होळ्यांमध्ये कायम ‘विकासच’ स्वाहा झालेला दिसतो आहे. प्रत्येकाला भांडवलवाढीचा, चांगल्या उत्पन्नाचा प्रसाद होलिकामातेने द्यावा अशी प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा आहे.
रिझर्व्ह बॅँकेने व्याजदरात अपेक्षेप्रमाणे 25 पैशांनी दर घटवले आणि जास्त अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे नाइलाजाने गव्हर्नर साहेबांना सांगावे लागले. महागाई आटोक्यात आणण्याचा हा केविलवाणा प्रयोग केला, परंतु महागाई कमी होईल अशा भ्रामक आशेत गुंतवणूकदारांनी राहू नये. डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स (डीडीटी) संपूर्णत: काढून टाकणे आणि दीर्घकालीन भांडवली नफा कराच्या जाळ्यातून मुक्त केल्याशिवाय भांडवल बाजार वाढेल असे वाटत नाही. व्याजदर किमान 2/3 टक्के कमी करण्याची गरज आहे, परंतु तशी शक्यता सध्यातरी वाटत नाही. आर्थिक विकासाची गाडी रुळावर आहे अशा घोषणा होताहेत, परंतु वास्तव परिस्थिती वेगळी आहे. पुढील 1-2 वर्षांसाठी गुंतवणूक शक्यतो मासिक उत्पन्न योजना, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन, डेब्ट फंड किंवा चांगल्या मुदत ठेवींच्या योजनांमध्येच करावी आणि मिळालेल्या व्याजात दरमहा एसआयपी करावी. 15 मार्चची अ‍ॅडव्हान्स टॅक्सची आकडेवारी समाधानकारक नाही. चौथ्या तिमाहीचे कामगिरीचे मूल्यमापन उत्साहवर्धक नसेल. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जनता उन्हात महागाईत आणि वाढत्या मंदीत होरपळायला लागली आहे. संपूर्ण राज्यांत पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. येणारा उन्हाळा तेजीच्या बैलाला मानवणार नाही.
गुंतवणूक क्षेत्रात दीर्घकालावधी धोरण असल्यास एसआयपीच्या माध्यमाने चांगले इक्विटी फंड आकर्षक वाटताहेत. संपत्ती संरक्षण आणि कर बचत यांच्या योग्य समतोलासाठी यूटीआयची युलिप योजना चांगली आहे. व्याजाचे भविष्यात निश्चित कमी होतील. त्यामुळे डेब्ट फंडात विशेष लक्ष द्यावे. वित्तीय क्षेत्रातील वाढता गोंधळ बघता भविष्यात गुंतवणुकीला भरमसाट महत्त्व मिळेल. सोने, रिअल इस्टेट यामुळे आकर्षक गुंतवणूक परतावा देणार नाही त्यामुळे इक्विटीचे महत्त्व वाढेल. गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने अथवा करिअरच्या दृष्टीने प्रचंड पैसा आणि या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरचे संबंध आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात होऊ शकतो. गुंतवणूक फक्त पैशाचीच होते असे नाही. उन्हाळी सुटीत ज्ञानाची गुंतवणूक वाढवल्यास भविष्यात धनलाभाचे घबाड मिळते हे स्वानुभवावरून कळाले आहे. पैशाची आणि ज्ञानाची गुंतवणूक यांचा योग्य समन्वय झाल्यास होलिकामाता 2013 हा धनलाभासाठी मुक्त ‘तेराच’ आहे. असे सांगू शकते. सर्व वाचकांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
iudit@sify.com