आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Prime Minister 's Indepence Day By Chaitanya Wangikar, Divya Marathi

विकासासाठी जगाला ऐतिहासिक निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकसित देश होण्याकरिता अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. स्वत:ला प्रधानसेवक म्हणवून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात देशाचा विकास होण्याकरिताची आपली तळमळ जाहीरपणे देशाच्या जनतेसमोर मांडली आहे.

भारत एक उत्कृष्ट ब्रॅँडचा संदेश :
मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताला जगासमोर एक ब्रॅँड म्हणून प्रस्थापित करण्याकरिता उत्कृष्ट भाषण केले. भारताला उत्पादनक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात व्यक्त केले. लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात पंतप्रधानांनी विदेशी गुंतवणूकदारांच्या भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीला चालना मिळण्याकरिता, कम, मेक इन इंडिया, ची घोषणा केली. एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी एवढे उघडपणे देशाच्या विकासासाठी जगाला निमंत्रण देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. यामुळे निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल जगभरात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

भारताची एतद्देशीय उत्पादन, निर्मिती फक्त 16 टक्के :
भारताच्या एकूण एतद्देशीय उत्पादनात निर्मिती किंवा उत्पादनक्षेत्राचा जवळपास 16 टक्के आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात उत्पादनक्षेत्रात गुंतवणूक वाढवल्यास भारतीय उद्योजकांना उत्पादनक्षमता वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल. रोजगारसंधी उपलब्ध होतील. देशाचा विकास जोमाने होईल. आणि भारत जगासमोर एक आर्थिक महासत्ता म्हणून लवकरच प्रस्थापित होईल.

(लेखक हे स्ट्रॅटमन कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संचालक आहेत)