आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक संकेतांवर ठरणार शेअर बाजाराची चाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील प्रमुख बाजारातील विक्रीच्या रेट्यामुळे भारतीय शेअर बाजारांतही मोठी घसरण दिसून आली. चीनच्या अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे विक्रीचा दबाब वाढला. अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून रोखे खरेदीत कपातीच्या निर्णयाची त्यात भर पडली आणि घसरण आणखी वाढली. अमेरिकेतील शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण दिसून आली. एस अँड पी 500 निर्देशांक गेल्या जूननंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर आला. औद्योगिक क्षेत्रातील अपेक्षेपेक्षा कमी वाढीचे मुख्य कारण त्यामागे होते, तर जोखमीच्या गुंतवणुकीपासून चार हात लांब राहण्यासाठी गुंतवणूकदारांना आणखी एक कारण मिळाले. जानेवारीत अमेरिकेचे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र अत्यंत संथ गतीने वाढले. नव्या ऑर्डरचे प्रमाण गेल्या 33 वर्षांतील सर्वात कमी स्तरावर आले. तर डिसेंबरमध्ये बांधकाम प्रकल्पांवरील खर्चात नाममात्र वाढ झाली. एकंदरीत जगातील सर्वच शेअर बाजारात नकारात्मक कल दिसून आला. मंगळवारी भारतीय शेअर बाजारात तेजीची झुळूक दिसली,मात्र व्यापकदृष्ट्या कल आणखी प्रतिकूलच आहे.
घटनांच्या बाबतीत हा आठवडा महत्त्वाचा आहे. अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी जाहीर होणार आहे. बुधवारी चॅलेंजर ले ऑप डाटा आणि गुरुवारी साप्ताहिक जॉब लेस क्लेमचे आकडे जाहीर होणार आहेत. शुक्रवारी अकृषी क्षेत्रांतील नोक-या आणि बेरोजगारीची आकडेवारी जाहीर होणार आहे. यावर बारकाईने नजर ठेवायला हवी. ही आकडेवारी सकारात्मक आली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर आल्याचे संकेत मानावेत.
जानेवारीतील घसरलेल्या वाहन विक्रीने या धास्तीत जास्तच भर टाकली आहे. एचएसबीसी मार्केट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय 51.4 राहिला. यामुळे भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आशेचा किरण निर्माण झाला आहे, तरीही बाजारात घसरण कायम आहे. अशा स्थितीत देशातील शेअर बाजार जागतिक बाजाराकडून मुख्यत्वे चीन आणि अमेरिकेकडून मिळणा-या संकेतावर अवलंबून राहील.
तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला खालच्या दिशेने 5911 वर मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यावर नजर ठेवायला हवी. माझ्या मते निफ्टीला हा आधार मिळायला हवा आणि तेजी यायला हवी. निफ्टीने हा स्तर सोडला तर मात्र घसरÞण दिसून येईल. अशा स्थितीत आधारपातळी 5791 वर जाईल, तरीही 5911 हा एक चांगला स्तर राहील. वरच्या दिशेने निफ्टीला 6079 वर हलका अडथळा आहे. निर्देशांकाला 6179 वर महत्त्वाचा अडथळा आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवावे. कारण निफ्टीने हा स्तर पार केला तर अल्प काळासाठी बाजारात तेजी आल्याचे ते द्योतक मानावे.
या शेअर्सकडे ठेवा लक्ष : शेअर्सच्या बाबतीत, या आठवड्यात डीश टीव्ही लिमिटेड, एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम स्थितीत दिसताहेत. डीश टीव्हीचा मागील बंद भाव 47.15 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 49.50 रुपये तर स्टॉप लॉस 45 रुपये आहे. टेक महिंद्राचा मागील बंद भाव 1770.85 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 1794 रुपये तर स्टॉप लॉस 1744 रुपये आहे, तर एलआयसी हाउसिंग फायनान्सचा मागील बंद भाव 193.15 रुपये आहे. त्याचे टार्गेट 198 रुपये तर स्टॉप लॉस 189 रुपये आहे.
लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dainikbhaskargroup.com