आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Share Market And National Stock Exchange

निफ्टीचे लक्ष्य आता 5756 या पातळीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्याजदरातील संभाव्य कपातीमुळे सध्या शेअर बाजारात तेजी दिसत आहे. विविध फंड तसेच दलालांनी खालच्या पातळीवर केलेल्या जोरदार खरेदीने या तेजीला बळ मिळाले. सप्ताहाची सुरुवात घसरणीने झाली. जागतिक बाजारात संमिश्र संकेत होते, तर देशातील बाजारात सकारात्मक संकेतांचा अभाव होता. त्यातून नफेखोरी मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यानंतर परिस्थिती काहीशी सुधारली.

इन्फोसिसच्या तिमाही निकालाने निराशा केली. त्यामुळे आयटी क्षेत्रातील समभागांत मोठ्या प्रमाणात नफेखोरी दिसून आली. इन्फोसिसच्या समभागात एका दिवसात 21 टक्के घसरण दिसून आली. मात्र, औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि महागाईच्या दराने बाजाराचा मूड बदलला.

घाऊक महागाईचा दर मार्चमध्ये घटून 5.95 टक्के झाला. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा हा दर कमी आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तीन मे रोजी जाहीर होणा-या पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदरात कपातीची शक्यता दुणावली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कमी व्याजाची आवश्यकता आहे. मात्र, चढ्या महागाई दराचा त्यात प्रमुख अडथळा होता. मात्र, आता महागाई दर तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर आल्याने व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे.

महसुली तसेच चालू खात्यातील वित्तीय तूट वाढत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आहे. मात्र, सोमवारी सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीने शेअर बाजारात नवे चैतन्य आले. भारतीय व्यापाराचे संतुलन बिघडण्यात यो दोन्ही कमोडिटींचा मोलाचा वाटा आहे. आता सोने व तेलाच्या किमती गतीने घसरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मंगळवारी शेअर बाजारात आलेल्या तेजीत याचे प्रतिबिंब दिसून आले.

मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे निफ्टीला पहिला अडथळ 5534 या पातळीवर होईल. त्यानंतर पुढील अडथळा 5608, तर त्यापुढील तगडा अडथळा 5678 या पातळीवर होईल. निफ्टीने 5534 हा स्तर पार केला आहे. तेजीच्या संकेतात प्रारंभी काहीसा दबाव दिसून आला. मात्र, निफ्टीने वर उल्लेख केलेले सर्व अडथळे पार केले. निफ्टी लेख लिहीपर्यंत 5689 वर होता. यावरून स्पष्ट होते की, सध्याच्या तेजीच्या वातावरणात निफ्टी वरच्या पातळीच्या नजीक आला आहे. निफ्टीने हा स्तर पार केल्यास, त्यास पुढील अडथळा 5720 वर मिळेल.हा एक चांगला अडथळा आहे. निफ्टीने हा अडथळा पार केल्यास पुढील अडथळा 5756 या पातळीवर मिळेल. माझ्या मते, सध्याची तेजी या पातळीवर संपायला हवी आणि काही करेक्शन तसेच कन्सोलिडेशन दिसायला हवे. खालच्या दिशेने निफ्टीला 5602 वर चांगला आधार आहे. सामान्य परिस्थितीत निफ्टी या पातळीखाली येणार नाही. मात्र, या पातळीपूर्वीच निफ्टीला 5652 या पातळीवर चांगला आधार मिळेल.

शेअर्सच्या बाबतीत मागील आठवड्यात बीएचईएल लिमिटेड, सेसा गोवा लिमिटेड आणि रॅनबक्सी लिमिटेड चार्टवर उत्तम वाटताहेत. बीएचईएलचा मागील बंद भाव 182.35 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 188 रुपये आणि स्टॉप लॉस 176 रुपये आहे. सेसा गोवाचा मागील बंद भाव 143.40 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 148 रुपये आणि स्टॉप लॉस 139 रुपये आहे, तर रॅनबक्सीचा मागील भाव 449.20 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 457 रुपये आणि स्टॉप लॉस 440 रुपये आहे.
लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com सीईओ आहेत.