सद्य:स्थितीत शेअर बाजार / सद्य:स्थितीत शेअर बाजार कन्सोलिडेट होण्याच्या शक्यता

विपुल वर्मा

Apr 03,2014 12:22:00 AM IST

शेअर बाजारांमध्ये सलग एक रॅली सुरू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आऊटलूकमध्येही काही बदल झालेला नाही. पण परकीय फंडांकडून निधीचा प्रवाह सुरूच आहे. सर्व प्रमुख आर्थिक पॅरामीटर्स फारशा चांगल्या स्थितीत नसतानाही गुंतवणूकदारांचा जो उत्साह दिसून येत आहे, त्यामुळेच निर्देशांक रोज नवीन विक्रम रचत आहे.
कमकुवत आर्थिक निर्देशांकात सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आकडा महसुली तुटीचा आहे. ही तूट एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान वाढून 100.03 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. हा आकडा अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. व्यापा-यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, कारण त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमधून सकारात्मक निकाल मिळण्याची अपेक्षा आहे.

चौथ्या तिमाहीदरम्यान परकीय कर्जात वाढ ते 426 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. हा आकडा तिस-या तिमाहीत 400.03 अब्ज डॉलर होता. त्यात नुकताच आलेला एचएसबीसी मार्केट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचा आकडाही निराशाजनक ठरला आहे. फेब्रुवारीच्या 52.5 मध्ये घट होऊन तो मार्चमध्ये 51.3 वर आला. यावरून मार्च महिन्यात अर्थव्यवस्थेत उत्पादनक्षमता घटली असल्याचे स्पष्ट होते. ऑ टोमोबाइल क्षेत्रात मार्च महिन्यात तेजी दिसून आली असली, विक्रीची आकडेवारी पाहता निराशाच झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनीही अर्थव्यवस्थेच्या सद्य:स्थितीबाबत चेतावणी दिल्याने चिंता अधिकच वाढल्या आहेत. जानेवारी 2014 नंतर देशाचा विकास दर आणखी मंदावण्याचा धोका वाढला असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच मुख्य संकेतांकांकडूनही अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याचा इशारा मिळत नाही. त्यामुळे बाजारात उत्साहाबरोबर जागरूकतेने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. रिझर्व्ह बँकेच्या एका सर्वेक्षणानुसार भारताचा जीडीपी विकास दर 5.5 एवढा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी शेअर बाजारात मोठे डाव टाकण्याचे काहीही कारण नसल्याचे माझे मत आहे.


जागतिक स्तरावर बाजाराचा मूड सतर्कतेबरोबरच सकारात्मक बनला आहे. चीनमध्ये एचएसबीसी मार्केट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचा आकडा फेब्रुवारी महिन्यात 48.1 हून घटून 48 वर आला आहे. जागतिक स्तरावर निश्चितच ही चिंतेची बाब आहे. कारण चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गती मंदावल्याचे यावरून स्पष्ट होते. आता सर्वांच्या नजरा अमेरिकेच्या जॉब डेटावर असणार आहेत. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबत संकेत मिळण्याच्या शक्यता आहेत. खासगी क्षेत्रातील नोक-यांसंदर्भातील आकडेवारी बुधवारी तर बिगर कृषी क्षेत्रातील नोक-यांची आकडेवारी शुक्रवारी येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडून संकेत मिळण्यासाठी यावर नजर ठेवणे गरजेचे ठरणार आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे धोरण प्रामुख्याने बेरोजगारीच्या आकडेवारीवर ठरणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारावर या आकडेवारीचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे.


देशांतर्गत बाजाराचा विचार करता. सध्या रोजचे उच्चांक पाहता निर्देशांक कंसोलिडेट होण्याची शक्यता आहे. निफ्टीने 28 मार्च ला 6729.75 चा विक्रमी उच्चांक गाठला होता. गेल्या दोन दिवसांत निफ्टीने दोन वेळा नवा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र निफ्टीला सध्या 6709 च्या सध्याच्या पातळीवरच महत्त्वाचा सपोर्ट आहे. जर हा याच्या खालच्या पातळीवर बंद झाला तर त्यात आणखी निराशा दिसून येऊ शकते. अशा परिस्थितीत पुढील सपोर्ट 6663 वर मिळेल तर 6560 वर इमिडिएट स्ट्राँग सपोर्ट मिळेल. पुढे आणि घसरणीचा अंदाज घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी आधी निफ्टीच्या 6709 ची पातळी निर्णायक पद्धतीने पार करण्याची वाट पाहायला हवी. मात्र त्याआधीच निफ्टी 6746 ची पातळी गाठण्याचा प्रयत्न करण्याच्या अधिक शक्यता आहेत.


निफ्टीला वरच्या बाजूला 6746 वर पुढील रेझिस्टंस मिळेल. या पातळीजवळ काही कन्सोलिडेशन आणि नफेखोरी दिसून येऊ शकते. जर निफ्टीने ही पातळी पार केली, तर पुढील रेझिस्टंस 6791 वर मिळेल. हा निफ्टीसाठी एक तगडा रेझिस्टन्स ठरेल. समभागांमध्ये या आठवड्यात आयडीएफसी लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड आणि टेक महिंद्रा लिमिटेड चार्टवर चांगल्या परिस्थितीत दिसत आहेत. आयडीएफसीचा बंद दर 123.10 रुपये आहे. त्याचे पुढी टार्गेट 128 रुपये आणि स्टॉप लॉस 118 रुपये आहे. टाटा मोटर्सचा बंद भाव 403.15 रुपये आहे. पुढील टार्गेट 414 रुपये आणि स्टॉप लॉस 391 रुपये आहे. तर टेक महिंद्राचा बंद भाव 1819.55 रुपये आहे. याचे पुढील टार्गेट 1848 रुपये आणि स्टॉप लॉस 1776 रुपये आहे.


- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.

X
COMMENT