आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Share Market By Vipul Verma, Divya Marathi

शेअर बाजारात आता सतर्कतेची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यातपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आवश्यक ती पावले टाकण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. तसेच जुलैमध्ये घाऊक महागाई दर अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने वातावरण सकारात्मक राहिले. अर्थचक्राची गती वाढवण्यासाठी नाणेनिधी धोरणाच्या माध्यमातून उपाय करण्यात येतील, अशी धारणा अजूनही बाजारात आहे. आंतरराष्ट्रीय संकेतांबाबत सांगायचे झाले तर युक्रेनमधील तणाव नविळल्याने युरोपमधील शेअर बाजारांत काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. भौगोलिक-राजकीय तणाव काहीसा नविळल्याने कच्च्या तेलाच्या किमतीही १४ महनि्यांच्या नीचांकावर आल्या आहेत. यामुळे जगातील महागाई कमी होण्याच्या शक्यतेने बाजारावर चांगला परिणाम होईल. तिकडे अमेरिकेतील शेअर बाजारातील तेजीने नॅसडॅकला १४ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. युरोप आणि आशियातील प्रमुख बाजारांतील वातावरण सकारात्मक बनले आहे. या सकारात्मक वातावरणात काही िचंताही आहेत. भारतीय शेअर बाजार त्याच्या मानाने जास्तच महागला असल्याचा पुनरुच्चार एचएसबीसीने केला आहे. असे असूनही बाजारात तेजी दिसते आहे.

आगामी काळाचा विचार केल्यास बाजाराचा कल मोठ्या प्रमाणात सकारात्मकच राहील. मात्र गुंतवणूकदारांनी शेअरमधील विशेष गुंतवणुकीच्या संधी शोधण्याची वेळ आता आली आहे. एफआयआय गुंतवणूक आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम असूनही शेअर बाजाराची धारणा सकारात्मक राहिली आहे. मात्र तांित्रक चार्ट सतर्कतेचे संकेत देत आहे. हा विरोधाभास असून तांित्रक मुद्द्यांवर चालण्याचा माझा सल्ला राहील. तांित्रक संकेतानुसार गुंतवणूकदारांनी सतर्क राहणे आवश्यक असून काही प्रमाणात नफा पदरात पाडून घ्यावा. टेक्निकल चार्टनुसार बाजार सध्या ट्रेंड बदलणार नसून त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. बाजारात घसरण येण्याचे काही संकेत सध्या दिसताहेत. याचाच अर्थ आगामी काळात गुंतवणूक करताना सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तांत्रिकदृष्ट्या निफ्टी सध्या नाजूक वळणावर आहे. बुधवारी हा घसरून ७८५९ च्या खाली आल्यास हा घसरणीचा पहिला संकेत मानावा. ७९४१ वर बंद झाला तर सकारात्मक संकेत मानावेत. निफ्टीच्या या दोन्ही पातळ्या त्याच्या मंगळवारच्या बंद पातळीच्या नजीक आहेत. त्यामुळे यावर बारीक नजर ठेवावी. अशा िस्थतीत निफ्टीला ७७९७ पातळीवर महत्त्वाचा आधार आहे. या पातळीवर काही प्रमाणात कन्सोलिडेशन दिसून येईल. या पातळीच्या खाली निफ्टी बंद झाल्यास ते घसरणीचे संकेत मानावेत.
निफ्टीला ७७५३ वर पुढील आधार आहे. सध्याच्या िस्थतीत हा एक चांगला आधार होणार. समजा निफ्टी वरच्या दिशेने ७९४१ ही पातळी पार करत असेल तर तो एक सकारात्मक संकेत राहील आणि त्याचे पुढील लक्ष्य ८००० ची पातळी पार करण्याचे राहील. निफ्टीनेही पातळी अद्याप गाठलेली नाही. त्यामुळे ही एक चांगली मानसिक अडथळा पातळी मानण्यात येत आहे. या शेअर्सकडे ठेवा लक्ष शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात िरलायन्स कॅपिटल िलमिटेड, कोल इंडिया लिमिटेड आणि केयर्न इंडिया िलमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. िरलायन्स कॅपिटलचा बंद भाव ५६३.३० रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट ५७४ रुपये आणि स्टॉप लॉस ५५१ रुपये आहे. कोल इंिडयाचा मागील बंद भाव ३६९.२५ रुपये आहे. त्याचे लक्ष्य ३७८ रुपये आणि स्टॉप लॉस ३५९ रुपये आहे. तर केर्न इंडियाचा मागील बंद भाव ३२३.४० रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ३३१ रुपये आणि स्टॉप लॉस ३१३ रुपये आहे.

लेखकतांत्रिक विश्लेषक आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dainikbhaskargroup.com