आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Share Market By Vipul Verma, Divya Marathi

शेअर बाजाराकडून घसरणीचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीर्घकाळ तेजीनंतर समभाग आणि बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली. नवीन संकेतांचा अभाव हे या घसरणीचे मुख्य कारण आहे. मी पूर्वीच नमूद केल्याप्रमाणे गुंतवणूकदारांनी आता बाजारातील वाढीच्या कलाकडे सतर्कतेने लक्ष द्यायला हवे. यामागचे मुख्य कारण असे की, बाजाराने खूप तेजी दर्शवली असून मूलभूत घटकांपासून बाजाराने पुढे चाल केली आहे. असे असले तरी त्यात घसरणीची शक्यता होती, मात्र िवदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने घसरण टळली. एकूणच पाहिले असता, निफ्टी आणि शेअर बाजारातील घसरण अपेक्षेनुसारच असून हे तांित्रकदृष्ट्या बरोबरही आहे.
मी मागील कॉलममध्ये नमूद केल्याप्रमाणे िनफ्टीला ८१९१ वर चांगला अडथळा होईल. मात्र, िनफ्टीने व्यवहारादरम्यान ८१८०.२० ही पातळी गाठली. आणि त्यानंतर घसरणीचा कल सुरू झाला. िवशेष म्हणजे िनफ्टीला ८०७३ ते ८०५५ या कक्षेत चांगला आधार िमळाला. हा आधार तुटल्यानंतर माझ्या अंदाजानुसार घसरणीचा कल वाढला आणि बाजार घसरला. जागतिक पातळीवरही संकेत फारसे सकारात्मक नव्हते. चीन वगळता जगातील इतर बाजारांतही घसरणीचा कल होता. अमेरिकेची अर्थव्यवस्था सकारात्मक संकेत देत आहे. त्यावरून अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणेच्या िदशेने दमदार पावले टाकत असल्याचे दिसून येते. असे असले तरी स्कॉटलंड येथे १८ सप्टेंबर रोजी होत असलेल्या जनमत कौलाबाबत अनिश्चित वातावरण आहे. यामुळे युरोप आणि िब्रटनच्या बाजारात गुंतवणूकदारांनी सतर्कतेचे धोरण अवलंबले. स्कॉटलंडमध्ये "होय' असे मतदान झाले, तर त्यामुळे िब्रटनमध्ये मोठी उलथापालथ होईल. हे लागू झाल्यास इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स यांचे ३०७ वर्षे जुने नाते संपुष्टात येणार आहे. तसेच या घडामोडीमुळे स्पेन, जर्मनी आदी देशांत अशांतता माजण्याची शक्यता आहे. जनमताची तारीख जवळ येत असल्याने युरोपातील बाजारात सतर्कतेचे वातावरण राहण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम जगभरातील बाजारात िदसून येईल.

देशातील आघाडीवर पाहिल्यास िकरकोळ महागाई दराचे आकडे अपेक्षेनुसार राहिले, तर घाऊक महागाईचे आकडे एका महिन्यात ५.१९ वरून ३.७४ टक्क्यांवर आले, ही मात्र आश्चर्याची बाब आहे. असे असले तरी औद्योगिक उत्पादन वाढीचा दर जुलैमध्ये गतीने घसरून ०.५३ टक्क्यावर आला आणि तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली. जूनमध्ये देशातील औद्योगिक उत्पादन ३.९५ आणि मेमध्ये ५ टक्के दराने वाढले होते. एकूणच मागील आठवड्यात जाहीर झालेली आर्थिक आकडेवारी संमिश्र राहिली.

आगामी काळाचा िवचार केल्यास बाजार आता घसरणीचे संकेत देतो आहे. िनफ्टीला ७८६१ वर पहिला चांगला आधार िमळू शकतो. हा महत्त्वाचा आधार असून या पातळीच्या आसपास बाउन्सबॅक िदसू शकतो. िनफ्टीचा हा स्तर तुटल्यास बाजारासाठी तो घसरणीचा संकेत राहील. अशा िस्थतीत आधार घसरून ७७५६ वर येऊ शकतो. जोपर्यंत िनफ्टी ८०५८ अंकांच्या वर बंद होत नाही, तोपर्यंत बाजारात अंडरटोन कमकुवत राहण्याची शक्यता आहे. िनफ्टी या स्तरावर बंद झाल्यास बाजारासाठी तो सकारात्मक संकेत राहील, जो िनफ्टीला ८१२८ या पुढील अडथळा पातळीवर पोहोचवू शकतो.

या समभागांकडे ठेवा लक्ष -
शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात महिंद्रा अँड महिंद्रा िलमिटेड आणि टेक महिंद्रा िलमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम िदसताहेत. एम अँड एमचा मागील बंद भाव १३७२.३५ रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट १३९६ रुपये आणि स्टॉप लॉस १३३८ रुपये आहे, तर टेक महिंद्राचा मागील बंद भाव २४२३.२५ रुपये आहे. त्याचे लक्ष्य २४४९ रुपये आणि स्टॉप लॉस २३८७ रुपये आहे.

- लेखक टेिक्नकल अ‍ॅनािलस्ट अािण moneyvistas.com चे सीईअाे अाहेत.
vipul.varma@dainikbhaskargroup.com