आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कतेसह बाजारात बाउन्स बॅकची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजार वाढ नोंदवण्यात अपयशी ठरत आहेत. एका अहवालानुसार युरोपातील ईटीएफ फंडांकडून झालेल्या मोठय़ा विक्रीमुळे ही स्थिती झाली आहे. याचा दबाव एवढा आहे की किरकोळ गुंतवणूकदारालाही याचा फटका बसतो आहे. त्यातच देशातील फंडांच्या भांबावलेपणामुळे निराशेत भर पडली आहे. असे असले तरी जगभरातील बाजारात सतर्कतेसह सकारात्मक वातावरण आहे. काही बड्या आंतरराष्ट्रीय बाजारांची स्थिती भारतीय बाजारापेक्षा उत्तम आहे.

धोरणात्मक सुधारणांच्या दिशेने आणखी पावले न पडल्याने देशातील बाजारावर दबाव आहे. आर्थिक सुस्तीसह राजकीय अस्थिरता घसरणीचे कारण बनली आहे. एफआयआयसह बहुतेक गुंतवणूकदारांच्या मते, 4.5 टक्के जीडीपी विकासदर आणि सुधारणांच्या ठोस योजनेअभावी भारतीय बाजार महागडा वाटू लागला आहे.

अर्थमंत्र्यांच्या मते, 2012-13 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट लक्ष्यापेक्षा कमी ठेवण्यात यश येईल. तरीही सरकारच्या क्षमतेबाबत शंका घेतली जात आहे. महागाईचा सध्याचा स्तर पाहता पतधोरणात रिझर्व्ह बँकेला खूप र्मयादित वाव आहे. अर्थव्यवस्थेची गती झपाट्याने मंदावत आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.

जागतिक पातळीवर अमेरिकेतील संकेत संमिर्श ते सकारात्मक आहेत. मात्र, तेथील रोजगाराच्या आकडेवारीने निराशा केली. जपानने मोठे आर्थिक पॅकेज देऊन सर्वांना धक्का दिला. त्यामुळे तेथील शेअर बाजारात तेजी दिसून आली. चीनमधून सकारात्मक तर युरोपातून संमिश्र संकेत आहेत.

अल्पकाळात देशातील शेअर बाजार ओव्हर सोल्ड दिसत आहेत. बाजारात उसळी दिसायला हवी. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सतत सुरू राहिल्याने बाजार कसा तेजीत परतेल हे सांगणे कठीण आहे. असे असले तरी सध्याच्या स्तरावर मोठय़ा घसरणीची शक्यता नाही. खालच्या पातळीवर काही प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. माझ्या मते, 5442 या स्तरावर निफ्टी बॉटम शोधण्याची शक्यता आहे. ही पातळी निफ्टीसाठी मजबूत आधार ठरणारी आहे. मात्र, विक्रीचा जोर कायम राहिला तर निफ्टी 5347 पर्यंत खाली येऊ शकते. सध्या तरी निफ्टीसाठी ही सर्वात चांगली आधारपातळी समजण्यास हरकत नाही.


वरच्या पातळीवर निफ्टीला पहिला अडथळा 5534 वर मिळेल. मात्र, हा तात्कालिक आधार आहे, या पातळीवर बंद होणे निफ्टीतील तेजीचे संकेत आहेत. त्यानंतर 5608 या पातळीवर पुढचा अडथळा होण्याची शक्यता आहे. या स्तरावर काही प्रमाणात नफेखोरी दिसू शकते. निफ्टी या पातळीवर गेल्यास त्यास पुढचा अडथळा 5678 या पातळीवर होईल. येथे काही टेक्निकल कन्सोलिडेशन दिसू शकते. मात्र निफ्टीचा कल स्पष्ट करणारा आणि तगडा अडथळा 5755 वर मिळेल. जोपर्यंत निफ्टी यावर बंद होणार नाही तोपर्यंत बाजारात घसरण सुरू राहण्याची शक्यता आहे,

शेअर्सच्या बाबतीत टेक महिंद्रा लिमिटेड, डीएलएफ लिमिटेड आणि गेल इंडिया लिमिटेड चार्टवर उत्तम दिसत आहेत. टेक महिंद्राचा मागील बंद भाव 967.15 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 983 रुपये आणि स्टॉप लॉस 948 रुपये आहे. डीएलएफचा मागील बंद भाव 230 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 236 रुपये आणि स्टॉप लॉस 221 रुपये आहे. तर गेल इंडियाचा मागील बंद भाव 313.80 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 321 रुपये तर स्टॉप लॉस 311 रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व सीईओ आहेत.