आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील शेअर बाजार आता मंदीच्या विळख्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात निफ्टीने ८२९७ अंकांची नाजूक आधार पातळी तोडल्यानंतर समभाग आणि बेंचमार्क निर्देशांकांत मोठ्या प्रमाणात अपेक्षेनुसार मोठी घसरण दिसून आली. असे असले तरी निफ्टीला ८१८० या स्तरावर काही प्रमाणात आधार मिळाला. मात्र, विक्रीच्या मा-याने ही पातळीही तुटली आणि मंगळवारी निफ्टी २८ ऑक्टोबरनंतर आपल्या सर्वात खालच्या पातळीवर आला. जगातील प्रमुख शेअर बाजारांतील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. त्यातच रुपया ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याच्या वृत्तानेही वातावरण नकारात्मक बनले.
औद्योगिक उत्पादन तसेच महागाईच्या आकडेवारीने सप्ताहाची सुरुवात झाली. किरकोळ तसेच घाऊक महागाईतील घसरणीने बाजारात तेजी दिसून आली. इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर आला. हा पाच वर्षांचा नीचांक आहे, तर घाऊक महागाई सलग आठव्या महिन्यात घटून शून्यावर आली. गेल्या साडेपाच महिन्यांतील ही सर्वात खालची पातळी आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर १.७७ टक्के होता. औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीने ऑक्टोबर महिना खडतर राहिला. या महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक ४.२ टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे औद्योगिक उत्पादनाला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच व्याजदरात कपात करण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, रुपयाचे अवमूल्यन आणि जगभरातील बाजारातील घसरण पाहता संभाव्य व्याजदर कपातीला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेच्या समभागांची चौफेर विक्री झाली.

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरणे सुरूच असल्याने जगातील सर्वच बाजारांत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. चीनमधूनही आर्थिक आघाडीवर कमजोर संकेत िमळाले आहेत. त्यामुळेही बाजारावर परिणाम दिसून आला. मात्र, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. एकूण जागतिक स्तरावर शेअर बाजारांत मंदीचा कल आहे. मात्र आगामी काळात शेअर बाजार संशयास्पद भासतो आहे. कारण आठ टक्के करेक्शन आल्यानंतर अनेक कंपन्यांचे समभाग आकर्षक झाले आहेत. तरीही रुपया जोपर्यंत स्थिरावत नाही तोपर्यंत शेअर बाजाराकडून जास्त अपेक्षा नाहीत. विदेशी चलन बाजारातील २०१३ चे भय गुंतवणूकदारांच्या मनात आजही आहे.

तांत्रिकदृष्ट्या बाजार सध्या मंदीच्या विळख्यात आहे. आगामी काळात काही प्रमाणात सुधारणा दिसून येईल. निफ्टीला आता ७९७५ अंकांच्या आसपास तगडा आधार आहे. दरम्यान, निफ्टीला ८०३६ अंकांच्या आसपास मध्यम स्वरूपाचा आधार राहील. निफ्टी या पातळीच्या आसपास राहिला तर बाजारात काही प्रमाणात िरकव्हरी येण्याचे ते संकेत मानावेत. मात्र, मला वाटते की, ८०३६ ही आधार पातळी तुटली तरी ७९७५ चा आधार कायम राहील.
निफ्टीला वरच्या दिशेने ८१३४ वर पहिला अडसर आहे. हा मध्यम स्वरूपाचा अडसर आहे. निफ्टीने ही पातळी पार केल्यास तो ८२०२ पातळीपर्यंत वाढू शकतो. जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर बंद होत नाही तोपर्यंत बाजारात मंदीचे वातावरण राहील. दरम्यान, निफ्टीला ८३५४ अंकांच्या आसपास मजबूत अडसर होईल. सकारात्मक आणि नकारात्मक कलांची मर्यादा स्पष्ट करणारी सीमारेषा म्हणून या अडसर पातळीकडे पाहावे. जोपर्यंत निफ्टी या स्तराच्या खाली आहे तोपर्यंत बाजारात मंदीचे वातावरण राहील.

समभागांच्या बाबतीत या आठवड्यात ओएनजीसी लिमिटेड आणि एचडीएफसी लिमिटेड चार्टवर उत्तम दिसताहेत. ओएनजीसीचा सध्याचा बंद भाव ३३५.५५ रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट ३४३ रुपये आणि स्टॉप लॉस ३२५ रुपये आहेत. तर एचडीएफसीचा मागील बंद भाव १०८६.८५ रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य ११०८ रुपये आणि स्टॉप लॉस १०६२ रुपये आहे.
- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.varma@dainikbhaskargroup.com