आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर परतावा भरा, अजूनही उशीर झालेला नाही ....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विचार करा, तुम्ही जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या मोठ्या सुटीवर गेला आहात आणि ऑगस्टमध्ये परत आल्यावर तुमच्या लक्षात येतं, की ३१ जुलैपर्यंत तुम्हाला कर परतावा (टॅक्स रिटर्न) भरायचा होता किंवा तुम्ही या काळात अमेरिकेत होतात आणि भारतात आपल्याला कर परतावा भरायचा आहे हे तुमच्या लक्षातच राहीलं नाही? त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, या काळात तुम्ही रुग्णालयात दाखल असल्यामुळे वेळेवर परतावे भरू शकला नाहीत? पण लक्षात घ्या कर परतावा भरण्यासाठी कधीच खूप उशीर होत नाही.
1. प्रत्येकाला गेल्या वर्षी ३१ मार्च ते ३१ जुलै या चार महिन्यांत वर्ष संपल्यापासूनचे परतावे भरायला लागतात हे माहीत आहे. तुमचा व्यवसाय असेल आणि तो प्राप्तिकर कायदा १९६१ च्या अंतर्गत लेखापरीक्षणासाठी पात्र असेल किंवा तुम्ही एखाद्या अशा फर्ममध्ये भागीदार आहात, जिथे कोणत्याही कायद्यानुसार लेखापरीक्षण करणे बंधनकारक असते. अशावेळेस तुमची कर परतावा भरण्याची शेवटची तारीख त्यावर्षीची ३० सप्टेंबर आणि काही निवडक परिस्थितीत ३० नोव्हेंबर यापैकी असू शकते.
2. वेळेवर कर परतावा भरणे हे तुमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्याशिवाय, कर परतावे भरण्यामुळे बँका, वित्त संस्थांच्या नजरेत तुमची पत सुधारते आणि तुम्हाला बँकेचे कर्ज, गृहकर्ज, क्रेडिट कार्ड, परदेशी प्रवासासाठी व्हिसा भरणे सुलभ होते.
3. या उलट तुमचे उत्पन्न करपात्र असूनही जर वेळेवर कर परतावा भरला नाही, तर तुम्ही संकटाला निमंत्रण देता आणि त्याचे बेकायदेशीर परिणाम भोगावे लागतात. काही टोकाच्या परिस्थितीमध्ये कारवाईलाही तोंड द्यावे लागते.
4. जर कर परतावा भरण्याची शेवटची तारीख चुकली असेल, तरी आगामी दोन वर्षांत ज्या वर्षासाठीचे परतावे भरायचे राहिले आहेत त्या वर्षापासून पुढचे परतावे भरता येतात. म्हणजेच ३१ मार्च २०१४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्नावरील कर परतावा ३१ मार्च २०१६ पर्यंत भरता येतो. मात्र, न भरलेल्या कराच्या रकमेवर दरमहा एक टक्का याप्रमाणे जितका उशिरा झाला आहे तितके महिने व्याज भरावे लागते.
5. त्याशिवाय, जर परतावे एक वर्ष उशिरा भरलेले असतील, उदा. ३१ मार्च २०१५ नंतर ५००० रुपयांचा दंडही लागू होऊ शकतो. परतावा भरण्यात उशीर झाल्यास तेवढया कालावधीचे उत्पन्नावरील व्याज मिळण्यात तुम्ही अपात्र ठरता. तुम्हाला अजून एका गोष्टीची नोंद घ्यावी लागेल, ती म्हणजे उशिरा भरलेले परतावे सुधारले जाऊ शकत नाही तसेच झालेले नुकसान भविष्यात भरून काढण्याची तरतूद मिळत नाही. म्हणूनच जर तुमची शेवटची तारीख चुकली असेल, आणि जर तुम्हाला उत्पन्नावर कर परतावा भरणे गरजेचे असेल? अर्थातच असेल. जर कर विभागाने तुम्हाला परतावा भरण्याची नोटीस पाठवली, तर कर भरल्यानंतरही कर भरण्यापासून तुमचे उत्पन्न वाचवल्याबद्दल दंड होऊ शकतो. हा दंड म्हणजे तुमच्या सर्व उत्पन्नावर कर लागू होऊ शकतो किंवा कराची रक्कम तिप्पट होऊ शकते. मग कशाची वाट पाहताय? तुमची मोठी सुटी कर परतावा भरण्यासाठी सत्कारणी लावा.