आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Weekly Economy Review By R.Jagannathan

प्रमुख व्याजदरात कपात रिझर्व्ह बँकेने का टाळली?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दोन डिसेंबर रोजी प्रमुख व्याजदरात कपातीला नकार देत उद्योजक आणि सरकारची निराशा केली. ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई दर आणि घाऊक मूल्य सूचकांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित ठोक महागाई दर घसरून अनुक्रमे ५.५ आणि १.७७ टक्क्यांवर आलेले असतानाही राजन यांनी हे पाऊल टाकले. पुढील आठवड्यात नोव्हेंबर २०१४ चढे महागाईचे आकडे जाहीर होतील. त्यात हे दर आणखी कमी होतील.

सीबीआयने घाऊक महागाईचे दर जानेवारी २०१५ पर्यंत ८ टक्के आणि जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्क्यांवर राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आता घाऊक महागाईचे दर जानेवारी २०१६ च्या आधीच लक्ष्याच्या खाली आला आहे. मात्र, तरीही सीबीआयने व्याजदरात कपात न केल्याने उद्योजकांना आश्चर्याचा धक्का बसला. आयबीआय व्याजदर कपात का टाळत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. राजन यांनी येत्या मार्च-एप्रिलमध्ये व्याज कपातीचा दावा करण्याऐवजी नाणेनिधीला कमल आताच बदलणे घाईचे ठरेल, असे सांगितले. मात्र, महागाई आणखी घसरल्या, वित्तीय तूट उत्साह जनक राहिल्यास पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसच धोरणात बदल शक्य आहे. यासाठी आयबीआय नेहमीच्या मार्गाने न जाता कपात करू शकते. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये आगामी तोरण आढावा आहे. फेब्रुवारीमध्ये कपात न झाल्यास मार्च व एप्रिलमध्ये कपात नाकारता येत नाही. आता प्रश्न असा आहे की, घाऊक महागाई जानेवारी २०१६ च्या लक्ष्याच्या खाली आली असेल तर राजन यांनी सतर्कता बाळगणे योग्य आहे का? तसे पाहिले तर महागाईतच घसरण बेस इफेक्टमुळे आली आहे. मागील वर्षातील महागाई दरावर बेस इफेक्ट अवलंबून असतो. मागील वर्षात बेस इफेक्ट जास्त राहिला असेल तर महागाईचा दर बेस इफेक्ट च्या तुलनेत कमी दिसतो. अशा रीतीने गेल्या वर्षात महागाई दर कमी राहिला असेल तर यंदा महागाई दरात वाढ झालेली दिसेल, कारण ज्या आधारावर (बेस) महागाईचे मोजमाप केले जाते तो मागील वर्षी कमी होता.

घाऊक महागाई दराचा अर्थात डब्ल्यूपीआयचा विचार केल्यास २०१३ मध्ये हा दर नोव्हेंबरपर्यंत सातत्याने वाढत राहिला. जानेवारी २०१३ मध्ये हा दर १७०.३० वर होती आणि तो वाढून नोव्हेंबरमध्ये १८१.५० या उच्चांकालर पोहोचला होता. त्यानंतर डिसेंबर २०१३, जानेवारी आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये हा दर १७९ ते १७९.६ या दरम्यान राहिला. नोव्हेंबर २०१३ मध्ये हा उच्चांकावर होता त्यामुळे पुढील आठवड्यात नोव्हेंबर २०१४ ची आकडेवारी येईल तेव्हा घाऊक महागाईचा दर घटून ऑक्टोबर २०१४ मधील १.७७ टक्क्यांहूनही खाली येईल. याशिवाय, नोव्हेंबर नंतर जेव्हा बेस (२०१३ पासून) १७९ वर येईल, तेव्हा डिसेंबर २०१४ आणि जानेवारी, फेब्रुवारी २०१५ मध्ये ठोक महागाई दरात घसरण राहील का हे सांगणे कटीण आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या मार्च ते जुलै या काळात डब्ल्यूपीआय पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. या काळात हा दर १८२ ते १८५ च्या आसपास राहिला. त्यामुळे राजन व्याजदर कपातीला टाळाटाळ का करत आहेत हे समजणे सोपे जाईल. नोव्हेंबरमध्ये त्यात घसरण होणार हे राजन जाणतात, त्यामुळेच थांबून प्रतीक्षा करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या काळात महागाई दर कसा राहतो याकडे त्यांचे लक्ष राहील. कारण या काळात बेस इफेक्ट कमी होईल. समजा या कालावधीत महागाई दरात घसरण झाली किंवा ते स्थिर राहिले तर मार्चनंतर तो पुन्हा खाली येणारच आहे, हे ते जाणतातच. २०१४ मध्येही या काळात बेस इफेक्ट जास्त झाला होता. याशिवाय या काळात अर्थसंकल्प जाहीर झाला होता. समजा २८ फेब्रुवारी २०१५ रोजी जाहीर होणारा अर्थसंकल्प सुधारणावादी राहिला आणि वित्तीय तूट जीडीपीच्या ४.१ टक्क्यांच्या आसपास राहिली तर अर्थमंत्र्यांनी काय उपाय योजले आहेत हे राजन यांनी माहिती राहील. मार्चच्या मध्यापर्यंत डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीची आकडेवारी समोर राहील, तेव्हा किरकोळ तसेच घाऊक महागाई दरातील घसरण संपली की नाही हे माहिती होईल. समजा या तीन महिन्यांत दर उच्च राहिला तर राजन यांना माहिती होईल की आगामी काही महिन्यांत - जेव्हा बेस इफेक्ट वाढेल तेव्हा महागाई उच्चांकावर राहील. यासाठी दर कपात लांबवून आरबीआयचे गव्हर्नर प्रभावी पद्धतीने महागाई जास्त वाढणार नाही याची तजवीज करताहेत. आपल्या निर्णयासाठी ते किरकोळ आणि घाऊक महागाई दराचा वापर करतील, २०१४ च्या मध्यापर्यंत किरकोळ महागाई दराचा कमल घाऊक महागाई दराप्रमाणेच राहील. महागाई दर दीर्घकाळापर्यंत खालच्या पातळीवर राहिला तर सातत्याने किमती वाढतातच, हा भारतीयांचा समज दूर होण्यास मदत होईल. अशा रीतीने मार्च २०१५ मध्ये महागाई कोणत्या पातळीवर राहते याची प्रतीक्षा राजन करत असून ते अगदी योग्य आहे.

लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आणि डीएनएचे माजी संपादक आहेत.
rjagannathan@dainikbhaskargroup.com