आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोइंग विमान कंपनी: 12 जण एकाच वेळी प्रवास करतील, असे विमान बनवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राइट बंधूंनी 1903 मध्ये आपल्या विमानातून जगातील पहिले ऐतिहासिक विमान उड्डाण केले. त्या वेळी 22 वर्षांचे विल्यम बोइंग यांनी येल इंजिनिअरिंग कॉलेज सोडले होते. टिंबर इंडस्ट्रीमधून चांगला नफा मिळवल्यानंतर 1910 मध्ये लॉस एंजलिसमध्ये ते पहिला एअर-शो पाहण्यासाठी गेले. तेथे त्यांनी विमानात बसण्यासाठी प्रयत्न केला. परंतु एअर-शोमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी त्यांना विमानात बसू दिले नाही. त्यामुळे बोइंग नाराज होऊन परत आले आणि विमान उड्डाणाच्या तंत्रज्ञानासंदर्भात अधिक शिकण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी त्यांची भेट नौदलातील अभियंता जॉर्ज कोनार्ड वेस्टरवेल्ट यांच्याशी झाली. वेस्टरवेल्ट यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केले होते. त्या काळात तयार झालेल्या बायप्लेनमध्ये पायलट आणि प्रवासी एकाच विंगवर बसून प्रवास करीत होते. हे बिल्कुल प्रॅक्टिकल नव्हते. त्यामुळे दोघांनी अधिक प्रॅक्टिकल विमान बनविण्याचा निर्णय घेतला.
1915 मध्ये बोइंग आणि वेस्टरवेल्ट यांनी ट्विन-फ्लोट सी-प्लेन बनविले आणि त्याचे नाव ठेवले बीएंडडब्लू. हे लाकूड, लिनेन आणि वायर यांच्यापासून बनले होते. परंतु त्यात तत्कालीन विमानापेक्षा अधिक चांगले फीचर होते. त्यांचे इंजिन 125 हॉर्सपावरचे होेते. त्या काळात ते खूप शक्तिशाली होते. त्यांनी हे विमान न्यूझीलंड फ्लाइंग स्कूलला विकले. बीएंडडब्ल्यूने 25 जून 1919 ला 6500 फूट उंच भरारी घेतली. हे त्या काळातील विमानांच्या तुलनेत जास्त होते. हे 120 किलोमीटर प्रतितास वेगाने जाऊ शकत होते. त्या वेळी त्याचा उपयोग पत्रांची ने-आण करण्यासाठी केला जात होता आणि दोनच जण प्रवास करू शकत होते.

1928 मध्ये बोइंग यांनी जगातील पहिले एअरलाइन तयार केले. जे प्रवाशांसाठी आरामदायक होते. आतापर्यंत सिंगल इंजिनचे विमान बनत होते. हे प्रवासी आणि सामान दोन्हीसाठी होते. वेल्डेड स्टील ट्युबिंगपासून हे विमान तयार केले होते. त्याला फॅब्रिकचे आवरण होते. त्यात लाकडाचा विंग टिप्स रिमूव्हेबल होते. केबिनमध्ये जास्त जागा होती. रीडिंग लॅँप, व्हेंटिलेशन, हॉट आणि कोल्ड रनिंग वॉटरसारख्या सुविधा होत्या. त्यात एकाच वेळी 12 प्रवासी प्रवास करू शकत होते. हे इतके लोकप्रिय झाले की पहिल्याच वर्षी 1900 प्रवाशांनी प्रवास केला. हे विमान साडेबावीस तासांपर्यंत उड्डाण करू शकत होते. वेग 220 किलोमीटर प्रतितास होता. हा वेग त्या काळातील विमानांपेक्षा कितीतरी जास्त होता. त्यात 525 हॉसपॉवरचे तीन इंजिन होते. पुढील वर्षी या विमानात अनेक सुधारणा केल्या गेल्या. मॉडेल 80 ए आणि 80 ए-1 तयार केले गेले. यात एकाच वेळी 18 प्रवासी बसण्याची सुविधा होती. 400 किलोपर्यंतचे सामान वाहून नेता येत होते.

आम्ही नवीन विज्ञान आणि उद्योगात नवनिर्मिती केली. जेथे समस्याही नवीन आणि असाधारण होती. परंतु त्याच्या संशोधनाच्या कल्पनेला कोणीही हे सांगून फेटाळू शकत नाही की, हे यशस्वी नाही. -विल्यम बोइंग
* संस्थापक विल्यम ई बोइंग
* कर्मचारी संख्या
1 लाख 69 हजार
स्थापना
1916
वार्षिक विक्री
5175.4 अब्ज रुपये
(2012-13)
नफा
274 अब्ज रुपये
(2012-13)