आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याच्या दरात विक्रमी निचांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याच्या दरात मे 2012 या महिन्यात सर्वाधिक निचांक नोंदवण्यात आला. आकडेवारीनुसार, मे महिन्यात सोन्याचा दरात सहा टक्के एवढी घसरण दिसून आली आहे. याअगोदर 1982 साली सोन्याच्या दरात 10 टक्क्यांची घसरण झाली होती. अमेरिकेतील आर्थिक संकट, युरोपमधील सरकारी कर्ज आणि आशियाई बाजारतील वाढलेल्या किमतींचा परिणाम यामुळे सहा टक्क्यां एवढी घट सोन्याच्या दरात नोंदवण्यात आली आहे.
जानेवारी 2000 नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच सोन्याचा दरात चौथ्यांदा मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सध्या प्रति तोळा सोन्याचा दर 29100 रूपये इतका आहे.
स्पेनचे बॅकिंग संकटामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यापासून लांब राहणेच पसंत केले आहे. आता गुंतवणणूकदारांनी यूरोपमधील वित्तीय संकटकडे पाहून डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे.
तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावात वाढ नोंदवली गेली. अमेरिकेत सोन्याचा वायदा 5.60 डॉलर एवढ्या मजबूतीने 1571.30 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला. तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आणि यूरोच्या स्थितीत सुधारणा झाली तर, सोन्याच्या मागणीत वाढ होउ शकते. परंतू असे होण्याची शक्यता फार कमी आहे.
आता सोने घ्या चोरीस जाण्याच्या भीतीशिवाय
रुपयाचे अवमूल्यन: सोने होणार स्वस्त