‘मारुती-सुझुकी’साठी वरदान ठरली / ‘मारुती-सुझुकी’साठी वरदान ठरली अर्टिगा कार

May 02,2013 08:40:00 AM IST

नवी दिल्ली - मंदीच्या वाटेवरून जाणा-या देशातील कार बाजारात सर्व कंपन्यांनी आपल्या बहुतेक मॉडेल्सवर ऑफर्स दिल्या आहेत. पेट्रोलच नव्हे, तर यात काही डिझेल मॉडेल्सचाही समावेश आहे. केवळ मारुतीच अशी कंपनी आहे, तिच्या अर्टिगा आणि डिझायर कारची बुकिंग आजही जोरात आहे. मंदीचे वातावरण असतानाही 25 एप्रिलपर्यंत स्विफ्टने 19 हजारांहून अधिक ग्राहकांची पसंती मिळवली, तर नवी अल्टो बाजारात सादर केल्याने मारुतीला फायदाच झाला आहे.

गेल्या चार महिन्यांत नव्या अल्टोची एक लाखाहून अधिक विक्री झाली आहे. टोयोटा वगळता मारुतीने जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, टाटा, ह्युंदाई आणि फोर्ड या कंपन्यांना मागे टाकले आहे.
मजबुती
रु.1,147.5

कोटींचा नफा कंपनीने 31 मार्च 2013 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत कमावला.
रु. 12,566.6
कोटी झाली कंपनीची एकूण विक्री चौथ्या तिमाहीत
हिस्सा वाढला
कार बाजारात मारुतीची विक्री गेल्या वर्षीच्या 42 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. खर्चात सातत्याने केलेल्या कपातीचा लाभ कंपनीला झाला.

आकडेवारीत मारुतीची भरारी
आकडेवारीवर नजर टाकल्यास कारच्या एकूण विक्रीत 4.64 घट झाली आहे, तर मारुतीचा बाजारातील वाटा 2.5 टक्के वाढली आहे. 2009 मध्ये मारुतीचा बाजारातील वाटा 52.2 टक्के होता. 2011-12 मध्ये अनेक नवे मॉडेल्स आल्याने मारुतीचा हिस्सा 42.4 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मारुतीचा बाजारातील वाटा 45 टक्क्यांहून अधिक झाला आहे. मारुतीप्रमाणेच ह्युंदाईचा बाजार हिस्साही वाढला आहे. प्रवासी कार क्षेत्रात मारुतीने 20.4 टक्के आकडेवारीसह भरारी मारली आहे.

X