आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arun Jaitley Hints At Spending Cuts Ahead Of Budget

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तयारी अर्थसंकल्पाची : खर्चाला आवर घालणार : जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी अर्थसंकल्पात सरकारी खर्चाला आवर बसण्याची शक्यता आहे. तसे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. सरकारचा कर्ज काढून खर्च करण्यावर भरवसा नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त करणे व कर्जाचा बोजा पुढीला पिढीच्या खांद्यावर टाकण्याचे धोरण अयोग्य असल्याचे जेटली म्हणाले.

जेटली यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्सफरन्सद्वारे देशातील उद्योजकांशी संवाद साधला. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री, एडीएजीचे प्रमुख अनिल अंबानी, अ‍ॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांचा सहभाग होता.

अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले, अर्थसंकल्पात सरकार स्थिर कर प्रणाली आणू शकते. यामुळे विदेशातील गुंतवणूकदारांत विश्वास निर्माण होईल. करासंबंधी वाद निवारणासाठी सरकार मदतीस येईल. कर प्रकरणातील तोडग्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले टाकली आहेत. उत्पन्नवाढीसाठी केंद्र तसेच राज्यांकडून अवास्तव प्रकार केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक
जेटली यांनी सांगितले, अर्थसंकल्पात पायाभूत क्षेत्रावर भर राहील. वीज, ऊर्जा, रेल्वे आणि बंदरासंबंधी हालचालींना वेग येईल. या क्षेत्रात सरकारची गुंतवणूक वाढणार आहे. पायाभूत प्रकल्पातील गुंतवणुकीवर जेटली यांनी भर दिला. मुकेश अंबानी यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर यंदा या क्षेत्रात सरकारकडून कमी गुंतवणूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. आर्थिक संरचनेचा आराखडा निश्चित करण्याची गरज असल्याचे सांगून जेटली म्हणाले, अलीकडे काही विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीत रस दाखवला आहे.

खर्चात कपात
वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत ४.१ टक्क्यांपर्यंत मर्यादित राखण्यासाठी सरकार नियोजनावरील खर्चात आणखी कपात करण्याची शक्यता आहे. सर्व सरकारी विभागाच्या नियोजनावरील खर्चात यापूर्वीच १० टक्के कपात करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित महिन्यात या खर्चात आणखी कपातीची शक्यता आहे.

(फोटो :मुंबईत आयोजित मुंबई नेक्स्ट कार्यक्रमात देशातील दिग्गज उद्योजकांत अशा गप्पा रंगल्या. या वेळी अंबानी बंधू, एसबीआयच्या अरुंधती भट्टाचार्य, टाटा समूहाचे सायरस मिस्त्री आदी.)