नवी दिल्ली- संसदेचे केंद्रीय अधिवेशन सात जुलैपासून सुरु होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली नुकतेच सत्तेत आलेले एनडीए सरकार आपला पहिला अर्थसंकल्प (बजेट) सादर करणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अर्थसंकल्पात कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अधिक सुविधा हव्या असतील तर कठोर निर्णयाला सामोर जाण्यासाठी तयार राहाण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले.
जेटली म्हणाले, देशाची अर्थव्यवस्थेला सुस्थितीत आणण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. 'लाभ' हा शब्द खुप चांगला आहे. परंतु हा लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशात आणि सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी काही रक्कम मोजावी लागेल. देशातील करप्रणालीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
(फाईल फोटो: अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी)
पुढील स्लाइड्सवर वाचा, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आणखी काय म्हणाले जेटली...