आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या सरकारच्या निर्णयांमुळेच अर्थव्यवस्थेत सुधारणा, जेटलींचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जीडीपीततेजी येताच श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली आर्थिक आघाडीवर एनडीए सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरी घेऊन प्रसारमाध्यमांसमोर आले.

आमच्या निर्णयांमुळेच अर्थव्यवस्थेत तेजी आली, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही निवेदन प्रसिद्धीस दिले. नव्या सरकारने २६ मे रोजी कामकाज सुरू केले. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे श्रेय आमचेच आहे, असा प्रतिदावा केला.

२०१४-१५ च्या पहिल्या तिमाहीच्या जीडीपीचे आकडे प्रसिद्ध झाले.त्यावरून आता दावे- प्रतिदावे सुरू झाले आहेत.

नव्या सरकारने आजवर काय केले?
१.संरक्षण -रेल्वे क्षेत्र एफडीआयसाठी खुले.
२. रिअॅल्टी-टाऊनशिप प्रोजेक्टसमध्ये एफडीआयचे सुलभीकरण.
३. निर्णयाचा वेग वाढवला. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी उपाय.
४. कर विवाद संपुष्टात आणण्याची खास व्यवस्था.

आता या उपाययोजना
१.सरकारी क्षेत्रात लवकरच निर्गुंतवणूक.
२. जीएसटी लागू करणार
३. हिवाळी अधिवेशनात विमा विधेयक आणणार.
४. सबसिडी अधिक व्यवहार्य करणार.

निर्णय प्रक्रिया सुलभ
पंतप्रधानमोदी यांनी सर्व अधिकार स्वत:कडेच ठेवल्याचा आरोप जेटलींनी फेटाळला. ते म्हणाले की, मी स्वत : दोन विभाग सांभाळत आहे. माझे मंत्रालयच निर्णय घेत आहे. आमच्याकडे सक्रिय पंतप्रधान असल्यामुळे निर्णय घेणे सुलभ झाले आहे.

मान्सूनचा परिणाम
जेटली म्हणाले की, मान्सूनचा परिणाम महागाईवर होऊ शकतो. दुष्काळ आहे तेथे तो जास्त जाणवेल. पण हा चिंतेचा िवषय नाही. विकास दर वाढला की महागाई वाढते. पण लोकांच्या उत्पन्नापेक्षा महागाईत जास्त वाढ होणे हा चिंतेचा विषय आहे. अलीकडे अन्नधान्य स्वस्त झाले.