आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assocham News In Marathi, Production Field, Divya Marathi

उत्पादन क्षेत्रात 3.2 दशलक्ष रोजगार निर्मिती शक्य - असोचेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत उत्पादन क्षेत्रात 3.2 दशलक्ष रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज असोचेमने केलेल्या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.देशातील उत्पादन क्षेत्राला संजीवनी मिळत असल्याने आर्थिक कामगिरीत सुधारणा होऊन 2012-17 या पंचवार्षिक योजना कालावधीत 3.2 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.


अकराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत रोजगार निर्मितीमध्ये 28.5 टक्क्यांनी वाढ झाली. 2007-08 मधील 10.45 दशलक्ष रोजगाराच्या तुलनेत 2007-08 ते 2011- 12 या कालावधीत उत्पादन क्षेत्राने 2.9 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्मिती केली असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. देशातल्या उत्पादन क्षेत्रात निर्माण झालेल्या एकूण रोजगार निर्मितीमध्ये तामिळनाडूचा वाटा 14.5 टक्के इतका सर्वाधिक असून त्यापाठोपाठ महाराष्‍ट्र (14 टक्के) आणि गुजरात (10 टक्के) या राज्यांचा क्रमांक आहे.