आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assocham Recommendation To Hike Price Of Petrol Diseal

पेट्रोल-डिझेलचे दर महागच ठेवावे सरकारने, असोचेम संघटनेची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या दरांनंतर आम आदमी पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होण्याची वाट पाहत असला तरी उद्योग जगताचे मत मात्र वेगळे आहे. असोचेम या संघटनेने पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर महागच ठेवण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.
नुकतेच सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकारी शुल्कात केलेल्या वाढीचेही स्वागतही असोचेमने केले आहे. तेलाचे दर घटल्यामुळे खासगी कंपन्यांना काही फायदा होईल, असे मत असोचेमने व्यक्त केले आहे.