आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assocham Report News In Marathi, Employment Opportunity, Divya Marathi

मध्यम दर्जापेक्षा प्रवेश पातळीवरील नोक-यांचे प्रमाण वाढले, असोचेमचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरील पदांसाठी असलेल्या नोक-यांमध्ये 5.1 टक्क्यांनी घट झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या वर्षात प्रवेश पातळीवरील नोक-यांमध्ये 6.7 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे असोचेमने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. नोक-या देणा-या विविध पोर्टलवरील साडेचार हजार कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या नवीन नोकरीविषयक माहिती तसेच 56 प्रमुख शहरांमधील राष्‍ट्रीय आणि स्थानिक पातळीवरच्च्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नोकरीविषक जाहिरातींचा आढावा घेऊन हे विश्लेषण करण्यात आले असल्याचे असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले.


शहरामंध्ये निर्माण झालेल्या नोक-यांचे प्रमाण एकूण प्रमाण घटले असून 2012 वर्षातल्या 5,52,000 वरून कमी होऊन मागील वर्षात 5,50,000 नोक-यांवर आले. प्रथम श्रेणीतल्या शहरांबरोबर दिल्ली आणि एनसीआर भागात प्रवेशपातळीवरील नोक-यांचे प्रमाण मागील वर्षात लक्षणीय 26.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांमध्ये प्रवेशपातळीवर नोक-यांचे प्रमाण अनुक्रमे 15.2 टक्के, 12.7 टक्के , 6.6 टक्के आणि 0.5 टक्क्यांनी वाढले आहे. मुंबई आणि चेन्नई या प्रथम श्रेणीतील शहरात प्रवेश पातळीवरील नोक-यांचे प्रमाण कमी झाले आहे.


नोक-यांचे प्रमाण घटले
शहरामंध्ये निर्माण झालेल्या नोक-यांचे प्रमाण एकूण प्रमाण घटले असून 2012 वर्षातल्या 5,52,000 वरून कमी होऊन मागील वर्षात 5,50,000 नोक-यांवर आले. प्रवेशपातळीवरील नोक-यांचे प्रमाण 26.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


द्वितीय श्रेणीतील शहरामध्ये प्रवेश पातळीवरील नोक-यांचे वाढलेले प्रमाण
नागपूर 64.7 टक्के
लखनऊ 39.1 टक्के
कोचिन 35.3 टक्के
विशाखापट्टणम 22.7 टक्के
विजयवाडा 15.9 टक्के
जयपूर 9.5 टक्के
मेरठ 6.9 टक्के
चंदिगड 6.8 टक्के


या द्वितीय श्रेणीतील शहरात प्रमाण घटले
भोपाळ 2.2 टक्के
सुरत 5.3 टक्के
पाटणा 9.7 टक्के
इंदूर 13 टक्के
गुवाहाटी 13.2 टक्के
म्हैसूर 16.7 टक्के
बडोदा 18.4 टक्के
कोइम्तूर 33.9 टक्के