आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asus Launches Transformer Book TX300 Windows 8 Hybrid

स्टँड-बाय सुविधेसह असुसचे 92 हजारांचे डिटॅचेबल नोटबुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डिजिटल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या असुस इंडियाने यू टीव्हीच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात निमुळता ‘विंडोज 8 टॅब्लेट’ आणि ‘ट्रान्सफॉर्मर बुक टीएक्स 300’ डिटॅचेबल नोटबुक बाजारात आणले आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाच्या संगीत अनावरण समारंभातच बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या हस्ते या दोन्ही उत्पादनांचेही अनावरण करण्यात आले.

असुस ट्रान्सफॉर्मर बुक हे डिटॅचेबल टॅब्लेटसह येणारे 13.3 इंची नोटबुक असून ते फूल एचडी आयपीएस टच पॅनेलसह उपलब्ध आहे. ते इंटेल कोअर आय 5 प्रोसेसरवर चालत असल्याने कोणत्याही लक्षणीय कामगिरी प्रदान करते. अतिजलद एसएसडीच्या माध्यमातून या नोटबुक आणि टॅब्लेटला वेगवेगळे स्टोअरेज पुरविण्यात आलेले आहे. असुस ट्रान्सफॉर्मर बुक विंडोज 8 प्रोफेशनलसहदेखील उपलब्ध आहे.

कामासाठी ताटकळावे लागणार नाही
नोटबुक मोडमध्ये दोन आठवड्यापर्यंतचा स्टॅँड-बाय टाइम असल्याने शट डाऊन होण्याची वाट पाहावी लागत नाही. स्टॅँड-बायने दोन सेकंदांमध्येच तुम्ही आपल्या कामास सुरुवात करू शकता.

मोबाइल डॉकपेक्षाही बरेच काही
यात मोबाइल डॉक असून तो बॅकलिट कीबोर्ड आणि स्मार्ट जेस्चर टचपॅडपेक्षाही अधिक काहीतरी आहे. 500 जीबी हार्ड ड्राइव्ह, दोन यूएसबी 3.0 पोटर्स आणि गिगाबिट लॅन अशा वैशिष्ट्यांनी युक्त असलेले हे नोटबुक आपल्या स्वत:च्या बिल्ट-इन बॅटरीसह येते.

स्मार्ट बॅटरी तंत्रज्ञान
फूल नोटबुक मोडमध्ये पाच तासांपर्यंतचे बॅटरी आयुष्य पुरवते आणि टॅब्लेट मोडमध्ये आठ तासांपर्यंतचे बॅटरी आयुष्य पुरवते. त्याची शक्ती वाढवताही येऊ शकते. डॉकची हार्ड ड्राइव्ह आणि पोर्ट्स डिझेबल करून फक्त कीबोर्ड आणि टचपॅड सक्रिय ठेवून नोटबुकचे बॅटरी आयुष्य अजून वाढवता येणारे तंत्रज्ञान यामध्ये उपलब्ध आहे. नोटबुक 8 तासांपर्यंत वापरता येऊ शकते.

उच्च दर्जाचा कॅमेरा
फ्रंट 720 पिक्सेल एचपी आणि रियर 5-मेगापिक्सेल कॅमेरा उच्च दर्जाची छायाचित्रे देते. स्क्रीनवर फक्त टॅप करूनही फोटो घेता येतो.