आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक 'पिनाटा' डुडलने साजरा केला गुगलचा 15वा वाढदिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रॅन्सिस्‍को- आघाडीचे सर्च इंजिन गुगल आज 15 वा वाढदिवस साजरा करत आहे. गुगलने एक आकर्षक 'पिनाटा' डुडल तयार करुन वाढदिवस साजरा केला आहे. गुगलच्‍या होमपेजवर पिनाटा डुडल लोड करण्‍यात आले आहे. ता-याच्‍या आकारातील पिनाटाला काठीने मारुन जास्‍तीत जास्‍त चॉकलेट्स गोळा करण्‍याचे यात आव्‍हान आहे. हा छोटासा गेम युझर्सना अतिशय आवडला आहे. गुगलने 15 व्‍या वाढदिवसानिमित्त काही तांत्रिक बदलही केले आहेत.

'गुगल'ने 1998मध्‍ये सुरुवात केली होती. लॅरी पेज आणि सर्जेई ब्रिन यांनी कॅलिफोर्निया येथे एका छोट्याशा जागेत गुगलची पायाभरणी केली होती. आज गुगलचे महावृक्ष झाले आहे. आयटी क्षेत्रात गुगल ही आघाडीच्‍या कंपन्‍यांपैकी एक आहे.

1998पासून गुगलने अनेक स्थित्‍यंतरे पाहिली. तंत्रज्ञानाच्‍या क्षेत्रात अनेक बदल झाले. मोठ्या संगणकांची जागा आज टॅब्‍लेट्सने घेतली आहे. स्‍मार्टफोन्‍सवर इंटरनेटचा वापर वाढला आहे. या बदलत्‍या तंत्रज्ञानासोबतच गुगललाही सांगड घालावी लागली. आज गुगलचे विश्‍व स्‍मार्टफोन्‍समध्‍ये सामावले आहे. या छोट्याशा उपकरणातून गुगलवर कोणत्‍याही प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकते.

गुगलचे भारतातील सर्च इंजिन प्रमुख अमित सिघल यांनी ब्‍लॉगमध्‍ये विचार मांडताना काही माहिती दिली आहे. मोबाईल आणि टॅब्‍लेट्ससाठी काही बदल करण्‍यात आले आहेत. टॅब्‍लेट आणि स्‍मार्टफोन्‍स वापरणा-यांना सुलभ आणि आकर्षक लुकची अनुभूती मिळणार आहे.