Home | Business | Gadget | at once time u can use g mail and facebook

एकाच वेळी जी-मेल आणि फेसबुकचा वापर

दिव्‍य मराठी | Update - Jun 22, 2012, 11:49 PM IST

फ्ल्युएंटच्या इंटरफेसमध्ये डाव्या बाजूला एक छोटी नेव्हिगेशन बार आहे. येथे युजर्सना सेटिंग्ज, ड्राफ्ट्स, स्टार्ट मेसेज, अ‍ॅटॅचमेंट, लेबल आणि ऑल मेल असे पर्याय दिसतील.

 • at once time u can use g mail and facebook

  काही महिन्यांतच फ्ल्युएंटची ई-मेल सर्व्हिस सुरू होत आहे. त्याचा इनबॉक्स तुम्हाला फेसबुकसारखाच वाटेल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चालू असलेला हा मॉडेल ई-मेल टेक्स्टिंगवाली फिलिंग देतो.
  रिप्लाय लिंक आहे खास
  कोणत्याही मेलचे उत्तर देण्यासाठी प्रथम त्याला उघडावे लागते. पण फ्ल्युएंटमध्ये पूर्ण संदेश उघडण्याची गरज नाही. इंटरनेटच्या उजवीकडे दिलेल्या रिप्लाय लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या मेलला उत्तर पाठवू शकता. तसे पाहू जाता ही सुविधा फेसबुकच्या क मेंट सुविधेसारखी आहे.
  नेव्हिगेशन बार
  फ्ल्युएंटच्या इंटरफेसमध्ये डाव्या बाजूला एक छोटी नेव्हिगेशन बार आहे. येथे युजर्सना सेटिंग्ज, ड्राफ्ट्स, स्टार्ट मेसेज, अ‍ॅटॅचमेंट, लेबल आणि ऑल मेल असे पर्याय दिसतील. विशेष बाब म्हणजे ‘बार’वर एकदा क्लिक केल्यास सगळ्या अ‍ॅटॅचमेंटची लिस्ट येईल. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास हा अ‍ॅटॅचमेंट सर्च करण्यासाठी पूर्ण इनबॉक्स शोधण्याची गरज नाही. स्लाइड शोमध्ये याचे सर्व पर्याय दिसतील.
  सर्च थोड्या वेगळ्या पद्धतीने
  फ्ल्युएंटमध्ये सर्च करणे पण थोडे वेगळेपणाचे राहील. हा इन्स्टंट सर्च तंत्रावर आधारित आहे. वरच्या बाजूला दिलेल्या सर्च बारवर एक शब्द टाइप करताच ई-मेलशी जोडलेले सर्व पर्यायी विषय दिसतील आणि सर्च शब्द पूर्ण होताच सर्व रिझल्ट्स सादर होतील.
  अन्य वैशिष्ट्ये
  याशिवाय जी-मेलचे नेटिव्ह फीचर, टू डू लिस्टलाही फ्ल्युएंटने फॉरमॅट केले आहे.

Trending