आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक नियोजनात जोखमीकडे लक्ष द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सुरक्षित गुंतवणुकीच्या नादात ब -या च वेळा आपण पोर्टफोलिओच्या जोखमीकडे दुर्लक्ष करतो. कर आणि खर्च वाचवण्याबरोबरच चांगला पोर्टफोलिओ जोखमीचेही चांगले व्यवस्थापन करतो. त्याद्वारे किमतीतील चढ-उतारांचा परिणाम कमी करून अल्पावधी तसेच दीर्घकालीन लक्ष्यापर्यंत सहजतेने पोहोचता येते. जोखमीचे उत्तम व्यवस्थापन करून चांगला परतावा देणारा पोर्टफोलिओ कसा बनवायचा याविषयी...

1. स्वत:ला ओळखा : गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना सर्वप्रथम स्वत:ला ओळखा. स्वत:च्या जोखमीचे ज्ञान आवश्यक आहे. म्हणजेच उद्दिष्टपूर्तीसाठी गुंतवणुकीत येणा-या चढ-उताराशी संबंधित संभाव्य जोखमीचा अंदाज लावणे आवश्यक आहे. याच्या आकलनासाठी इंटरनेटवरील विविध टूल्सची मदत घेता येते. केवळ स्वत:साठीच नव्हे, तर पत्नी तसेच इतर सदस्यांसाठी जोखमीचे प्रोफाइल तयार करा.
2. स्वत:चे ज्ञान वाढवा : बाजारात उपलब्ध विविध उत्पादनांची माहिती घ्या. एखाद्या विषयाचे सखोल माहिती जरी मिळवता आली नाही तरी ताज्या घडामोडींविषयी स्वत:ला अपडेट ठेवा. यासाठी गुंतवणूक सल्लागाराची मदतही घेऊ शकता. ते आपल्याला तांत्रिक बाबींची माहितीही देतील. सल्लागाराला नेहमी विविध प्रश्न विचारा. एखाद्या आर्थिक विषयाशी संबंधीत ब्लॉगचे सदस्य बना. अर्थविषयक मासिके खरेदी करा. यासाठी दर आठवड्यात वेळ द्या.
3. असेट अलोकेशन : सर्व अंडी एकाच पिशवीत ठेवू नयेत. ती फुटण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे सर्व गुंतवणूक एकाच असेट वर्गात नसावी. इक्विटी, डेट, गोल्ड आणि रियल इस्टेट यांसारख्या वेगवेगळ्या असेट वर्गांची ओळख करुन घ्या. लक्ष्य आणि जोखमीची क्षमता लक्षात घेऊन वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये गुंतवणूक करा. पोर्टफोलिओ संतुलित राखण्यासाठी दरवर्षी असेट अलोकेशनाची चाचपणी करा.
4.डायव्हर्सिफिकेशन (वैविध्य) : डायव्हर्सिफिकेशनमुळे एकाच असेट क्लासमधील विविध प्रकारच्या क्षेत्रांत गुंतवणूक करण्यास मदत होते. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाइड असावा, परंतु त्यात खूप वैविध्य नसावे. म्हणजे, विविध बँकांच्या मुदत ठेवी असाव्यात. त्यांच्या मॅच्युरिटी अवधी वेगवेगळा असावा. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत फंड मॅनेजर्स, असेट मॅनेजमेंट कंपनी, लार्ज-मिड-स्मॉल कॅप, विभिन्न सेक्टरमध्ये डायव्हर्सिफाय करा. डेटमधील गुंतवणूक करताना अल्पकाळ तसेच दीर्घकाळच्या रोख्यात आणि रियल इस्टेटच्या बाबतीत निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता असे वैविध्य असावे.
याशिवाय गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये लिक्विडिटीवरही लक्ष द्यायला हवे. चांगल्या प्रमाणात अलोकेशन आणि वैविध्य असणारा पोर्टफोलिओ संपत्ती वाढवणारी किल्ली आहे. त्यात जाखमीचेही उत्तम व्यवस्थापन होते.

लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक
असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.

mankaran.singal@dainikbhaskar.group.com