आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मायक्रो कार जितकी जुनी, तितकी आकर्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिझायनर मायक्रो कार्सची स्टाइलच त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांची बनावट फार लोकप्रिय ठरली...

महायुद्ध सरल्यानंतर युरोपात अनेक मायक्रो कार बाजारात उतरवण्यात आल्या. वाहतुकीच्या सोयीसाठी यांचे उत्पादन करण्यात आले. 1950 च्या दशकात आलेल्या 7 मायक्रो कार्सविषयी...
चॅम्पियन 400

फॉक्सवॅगनच्या धर्तीवर कारची बनावट

जर्मनीत तयार करण्यात आलेली ही टू-सीटर कार आहे. 398 सीसी, टू सिलिंडर इंजिन, रूफ कॅन्व्हास ही कारची तांत्रिक वैशिष्ट्ये. साधे व प्लेन डिझाइन असलेली ही कार डिटेलिंग्जशिवायही लोकप्रिय ठरली. रोटेटिंग सेमी-सर्क्युलर साइड विंडोज, गोलाकार-प्रमाणबद्ध स्टील बॉडीमुळे कार लक्षवेधी ठरली. रिअर इंजिनचे डिझाइन जर्मनीतील तत्कालीन फॉक्सवॅगनच्या पीपुल्स कारचेच घेण्यात आले आहे. फॉक्सवॅगनच्या तुलनेत हिचा आकार छोटा आहे. मात्र, किंमत जवळपास फॉक्सवॅगनइतकीच होती.

पुढील स्लाइडमध्ये, पाहा आकर्षक मायक्रो कार