Home | Business | Auto | audi 6 start there manufactring in aurangabad

ऑडी ६ चे उत्पादन औरंगाबादेत सुरू

वृत्तसंस्था | Update - Jun 10, 2011, 01:21 AM IST

शेंद्र्यातील ऑडीच्या प्रकल्पात दरवर्षी २००० ऑडी ६ कारची निर्मिती होणार आहे

  • audi 6 start there manufactring in aurangabad

    नवी दिल्ली- औरंगाबादच्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात ऑडी ६ या सेडान श्रेणीतील कारचे उत्पादन सुरू केल्याची घोषणा गुरुवारी लक्झरी कार निर्माती जर्मन कंपनी ऑडीने केली आहे.

    या वर्षाखेरपर्यंत ऑडी ६ भारतीय बाजारात सादर होणार असून त्या अनुषंगानेच हे उत्पादन सुरू झाल्याची माहिती कंपनीचे भारतातील मुख्याधिकारी मायकल पर्श्क यांनी दिली. शेंद्र्यातील ऑडीच्या प्रकल्पात दरवर्षी २००० ऑडी ६ कारची निर्मिती होणार आहे. सप्टेंबर २००७ मध्ये शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक परिसरात ऑडीचा प्रकल्प सुरू झाल्यापासून कंपनीने या अगोदरच ऑडी ए ४ आणि क्यू ५ प्रकारातील ५००० कारचे उत्पादन काढले आहे. नवीन ऑडी ६ पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायात दिली जाणार आहे. भारतात ऑडीकडून ऑडी ए ४, ए ६, ए ७, ए ८, क्यू ५, क्यू ७, आरएस ५ कुप, सुपरस्पोर्ट्स कार आर ८, ऑडी आर ८ स्पायडर या कार विकल्या जातात.

Trending