आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Audi A 3 Car Production At Aurangabad In Skoda Project

ऑडी ए-3 ही तयार होणार औरंगाबादेत; स्कोडा प्रकल्पातून कार बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लक्झरी कार निर्मिती करणार्‍या जर्मनीतील ऑडी कंपनीने फोक्सवॅगन समूहातील स्कोडा कंपनीच्या औरंगाबादेतील प्रकल्पातून ए-3 चे उत्पादन सुरू केले आहे. भारतात उत्पादित होणारी ए-3 ही ऑडीची पहिलीच लक्झरी कार आहे. कंपनीने आजवर देशात ए-6, ए-4 या सेडान कार तर क्यूएस, क्यू 7 व क्यू 3 या एसयूव्ही कार सादर केल्या आहेत. मात्र त्यांची सीबीयूअंतर्गत आयात करण्यात आली. ऑडीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य (उत्पादन) हुबर्ट वॉल्ट यांनी सांगितले, भारतीय बाजारपेठेवर सातत्याने नजर ठेवण्याच्या कंपनीच्या धोरणानुसार ऑडी ए-3 सेडानचे उत्पादन येथे सुरू करण्यात आले आहे.

मर्सिडीझनंतर आता ऑडी
आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतातच लक्झरी कार निर्मितीला प्राधान्य देत आहेत. या कारची मागणी व कमी निर्मिती खर्च ही त्याची कारणे आहेत. त्यामुळे मर्सिडीझ व बीएमडब्ल्यूनंतर ऑडीने उत्पादन सुरू केले आहे.

A-3
>महिनाभरात भारतीय बाजारात सादर होण्याची शक्यता.
>ए-3 सेडान पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध राहील.
>कुशल कर्मचार्‍यांमुळे औरंगाबादेत
>औरंगाबाद प्रकल्पातील पायाभूत सुविधा,
>कुशल कर्मचारी आणि उत्तम लॉजिस्टिक व्यवस्था यामुळे ऑडीने औरंगाबादला प्राधान्य दिल्याचे हुबर्ड वॉल्ट यांनी सांगितले.

दोन वर्षांत 14 हजार कार
ऑडीची औरंगाबादेतील प्रकल्पातून दोन वर्षांत 14 हजार कार निर्मितीची योजना आहे. ऑडी ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहील. कंपनीने देशात 2013 मध्ये 10,002 कारची विक्री केली आहे. देशात एका वर्षात 10 हजारांवर लक्झरी कार विक्री करणारी ऑडी पहिली कंपनी आहे. ए-3 ला 2014 मध्ये वर्ल्ड कार ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.
- जोए किंग, प्रमुख, ऑडी इंडिया