आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडी क्यू-3 चे उत्पादन औरंगाबादमध्ये सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जर्मनीची लक्झरी कार निर्माती कंपनी ऑडीने क्यू-3 या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल कारचे उत्पादन औरंगाबादेत सुरू झाल्याची माहिती ऑडीचे कार्यकारी सदस्य (उत्पादन) फ्रँक ड्रेव्हेस यांनी गुरुवारी दिली.
भारतात आता ए-4, ए-6, क्यू-5 आणि क्यू-7 या कारच्या उत्पादनासह क्यू-3 या पाचव्या कारचे उत्पादन होत आहे. प्रकल्पातील सुविधा, कुशल मनुष्यबळ व वाढती बाजारपेठ पाहता कंपनी औरंगाबादच्या शेंद्रा प्रकल्पाचा विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले. क्यू-3च्या उत्पादनासोबतच कंपनीच्या संपूर्ण क्यू र्शेणीचे स्थानिक उत्पादन येथे सुरू झाले आहे. यामुळे ग्राहकांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे.


असून, सर्व र्शेणीच्या कार सहज उपलब्ध होऊ शकतील. औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीत ऑडीचा प्रकल्प आहे.
एका शिफ्टमध्ये वर्षभरात 13,000 कारचे उत्पादन व निर्मिती करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.