नवी दिल्ली - ए-४ या सेडान कारमधील एअरबॅग कंट्रोल सॉफ्टवेअर अद्ययावत (अपग्रेड) करण्यासाठी ऑडी कंपनीने ६७५८ ए-४ कार रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर २०११ ते ऑक्टोबर २०१४ या काळात तयार झालेल्या ए-४ सेडान कारमध्ये ही सुधारणा करण्यात येणार असल्याचे ऑडी कंपनीने म्हटले आहे. यात केवळ सॉफ्टवेअरचे अपग्रेडेशन करण्यात येणार असून कोणताही भाग बदलण्यात येणार नसल्याचे ऑडीने स्पष्ट केले.
एअर बॅग्जची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे. या संदर्भात संबंधित कार मालकाला ऑडीच्या वितरकांकडून वैयक्तिक पातळीवर कळवण्यात येणार आहे.