आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांत ऑडीची निर्मिती दुप्पट करण्याचा निर्धार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय बाजारपेठेत पाय रोवल्यानंतर ऑडी या जर्मन कार निर्मात्या कंपनीने गुंतवणूक वाढवण्याची योजना आखली आहे. पाच वर्षांच्या दुसर्‍या टप्प्यातील गुंतवणुकीत औरंगाबादच्या शेंद्रा प्रकल्पातील उत्पादन 2015 पर्यंत दुप्पट करण्याचा ऑडीचा विचार आहे. प्रकल्पाची क्षमता वर्षाकाठी 20 ते 22 हजार कार उत्पादनाची आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख मायकल पेर्शे म्हणाले, ऑडीचा गुंतवणुकीचा पहिला टप्पा 2012 मध्ये संपला. पाच ते सहा वर्षांत कंपनीने 30 दशलक्ष युरोची गुंतवणूक केली. गतवर्षी शेंद्रा प्रकल्पातून 10 हजार कारचे उत्पादन झाले.

2015 पर्यंत या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने उत्पादन करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

क्यू-3चे उत्पादन
शेंद्रा प्रकल्पात सध्या ऑडी ए-4, ए-6, क्यू-5, क्यू-6 कारची निर्मिती होते. जुलै-ऑगस्टपासून क्यू-3 मॉडेलची निर्मिती येथे सुरू होणार आहे. लक्झरी कार सेगमेंटमध्ये ऑडी इंडियाने यंदा देशात अव्वल स्थान पटकावले. चालू वर्षात 20 टक्के वाढीचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. येथे उत्पादन केल्यास क्यू-3 ची किंमत राखली जाऊ शकेल.