आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीच्या काळातील गुंतवणूक औरंगाबादच्या विकासाला चालना देणारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र शासन आणि एमआयडीसीच्या माध्यमातून गुरुवारी मुंबईत गुंतवणुकीचे करार झाले. या माध्यमातून औरंगाबादेत 2081 कोटींच्या गुंतवणुकीतून अडीच हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. मंदीच्या काळातही औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची होणारी गुंतवणूक उपयुक्त ठरणार असल्याचे मत उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

क्षमता सिद्ध करणारे करार
जवळपास दोन हजार कोटींची गुंतवणूक ही औरंगाबादसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मंदीच्या काळात औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्या येत आहेत ही शहरातल्या ओद्योगिक क्षमता किती चांगली आहे ते दाखवते. या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळतील. आता लवकर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होणे गरजेचे आहे. त्यामुळे शहराच्या जीडीपीमध्ये सुधारणा होईल. मुनीष शर्मा, उपाध्यक्ष सीएमआय

नवीन कंपन्यासाठी झटावे
या कराराला मान्यता मिळणे ही शहरासाठी आनंदाची गोष्ट आहे. कॅनपॅक, रॅडिको, बडवे अशा कंपन्या त्यांच्या प्रकल्पाचे विस्तारीकरण शहराच्या विकासासाठी ते फायद्याचे आहे. मात्र कंपन्याच्या विस्तार होताना सरकारने नव्या कंपन्यादेखील येथे गुंतवणूक करतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन अनेक संधी निर्माण होतील. मुकुंद कुलकर्णी, माजी अध्यक्ष सीएमआय

निवडणुकीच्या प्रचारासाठी घोषणा
सरकारने करार नवीन केले असले तरी कॅनपॅक, गुडइयर टायर आणि पार्किन्सने अगोदरच त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पार्किन्सने दीड वर्षापूर्वीच जागा ताब्यात घेऊन बांधकामाला सुरुवात केली आहे.त्यामुळे यामध्ये नवीन फारसे काही नाही. केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी घोषणा करण्याचा हा प्रकार आहे. काही नवीन प्रकल्पामुळे रोजगारांच्या संधी मात्र निर्माण होतील. राम भोगले, अध्यक्ष मासिआ.