आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटो कंपोनंट उद्योगाला मिळणार पॅकेजचा डोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निर्यातवाढीचा वेग वाढवण्यासाठी वाहनांचे सुटे भाग निर्मिती (ऑटो कंपोनंट )उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा विचार सध्या सरकार करत आहे. वाणिज्य मंत्रालय आणि अवजड उद्योग विभाग या क्षेत्रातील संभाव्य शक्यतांवर सध्या संयुक्तपणे विचार करत आहेत.

याविषयीची माहिती देताना एका अधिकार्‍याने सांगितले की, ऑटोमोबाइल कंपोनंट उद्योगाला निर्यात वाढवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी वाणिज्य मंत्रालयासोबतच अवजड उद्योग विभागही प्रयत्न करत आहे. स्थानिक बाजार तसेच निर्यातीत वाहनांची मागणी कमी झाल्यामुळे ऑटो कंपोनंट उद्योगाला मोठा फटका बसला आहे. मागील आठ महिन्यांपासून कार विक्रीत प्रचंड घसरण आली आहे. पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहन विक्रीत घसरण दिसून आली.