आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto Expo 2014 : वाहन उत्पादक कंपन्यांचा नव्या सुविधा,‍कमी किंमत या सूत्रावर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोयडा - देशातील वाहन उद्योग विक्रीच्या मार्गावर अडखळत असताना 12 व्या ऑटो एक्स्पोमध्ये नवीन मॉडेल्स सादर करण्यावर कंपन्यांनी भर दिला आहे. ऑटो उद्योगाला मंदीसदृश वातावरणातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याबाबत विचार करू, असे मत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी व्यक्त केले. गेल्या नऊ महिन्यांपासून देशातील वाहन विक्रीत मुख्यत्वे कारची विक्री घसरल्याचे चित्र आहे. नव्या संकल्पना, नव्या सुविधा व वाजवी किंमत या सूत्रांनुसार मॉडेल बनवण्यावर कार निर्मात्या कंपन्यांनी भर दिल्याचे जाणवले. नवीन मॉडेल्स वाहन उद्योगाला घसरणीच्या घाटातून बाहेर पडण्यास मदत करतील अशी कंपन्यांची अपेक्षा आहे.
‘सेडान ए-3’ ऑडीचे नवे आकर्षण :
सेडान गटात स्वस्त मोटारी मिळणे तसे कठीणच, पण ऑडीने ‘सेडान ए-3’ ही स्वस्त किमतीतील मोटार दाखल केली आहे. सध्या या मोटारीची किमत गुलदस्त्यात ठेवली असल्याने या वर्षाच्या मध्यापर्यंत ती बाजारात येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या ‘क्यू-3 एस’ ही 24.99 लाख रुपयांत मिळणारी स्वस्त सेडान आहे. याशिवाय ऑडी स्पोर्ट्स क्वाट्रो कन्सेप्ट कार तसेच ऑडी क्यू-3, ऑडी क्यू-5, ऑडी क्यू-7 या एसयूव्ही आणि ऑडी आरएस स्पोर्टबॅक ही वाहनेदेखील कंपनीने या प्रदर्शनात मांडली आहेत.
बुलेटप्रूफ एसयूव्ही - ‘एमएल गार्ड’ :
अतिविशिष्ट अर्थात ‘व्हीआयपी’ गटासाठी जर्मनीच्या मर्सिडीझ बेंझ या कंपनीने ‘एमएल गार्ड’ ही खास बुलेटप्रूफ एसयूव्ही बाजारात आणली असून त्याची किमत 2.49 कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त सीएलए 45 एएमजी ही स्पोर्ट सेडान आणि ‘जीएलए’ ही छोटेखानी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलदेखील कंपनी यंदाच्या वर्षात भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याची शक्यता आहे. भारतासह चीन आणि रशियातील बाजारपेठांमध्ये नवीन मोटारी आणण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे.
‘जग्वार एक्सजे’ची जुळवणी पुण्यात
भविष्यातील वाहन बाजारातील संधी ओळखून टाटा समूहाच्या मालकीच्या जग्वार लॅँडरोव्हरने ‘जग्वार एक्सजे’ या मोटारीची जुळवणी पुणे प्रकल्पात करण्याचा विचार केला आहे. या प्रकल्पात सध्या एक्सएफ, लॅँडरोव्हर फ्रीलॅँडर या मोटारींची जुळवणी होत आहे.
महिंद्राची ‘हालो’ इलेक्ट्रिक कार :
महिंद्रा अ‍ॅँड महिंद्राने ‘हालो’ ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटार ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शनार्थ ठेवली आहे. पुढील तीन वर्षांत ही मोटार बाजारात दाखल होणार आहे. ही मोटार पहिल्यांदा विदेशातील बाजारपेठेत आणण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘हालो’ची वैशिष्ट्ये म्हणजे आठ सेकंदांत प्रतितास 100 किलोमीटर वेग, पूर्ण चार्ज झाल्यावर प्रती तीस 160 किलोमीटर वेग शक्य आहे.
पुढे वाचा आणखी काही कारच्या मॉडेलविषयी......