आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto Expo 2014 It Open To Commen Man, Tax Free Dnd Flyover Bridge

\'ऑटो एक्स्पो\' आजपासून सामान्यांसाठी खुले; तीन तासांसाठी \'डीएनडी\' टोल फ्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाची राजधानीजवळच असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये सुरु असलेला 12वा 'ऑटो एक्‍सपो 2014' आजपासून (शुक्रवार) 11 फेब्रुवारीपर्यंत आम जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. जनतेला येण्या-जाण्याची सुविधा व्हावी, यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत 'डीएनडी' फ्लाय ओव्हर सायंकाळी 5 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑटो एक्‍सपोचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी जवळपास चाळीसपेक्षा जास्त कार सादर करण्यात आल्या. दुसर्‍या दिवशी मारुतीने आपली बहुचर्चित कार 'सेलेरियो' सादर केली.

एक्सपोमध्ये शुक्रवारी सकाळपासून बॉलिवूड स्टारची रेलचेल दिसून आली. अभ‍िनेता जॉन अब्राहम यामाहाच्या स्टॉलवर उपस्थित झाला. हिरोचा ब्रांड अँबेसडर अक्षय कुमार हा देखील उपस्थित राहणार होता. परंतु त्याच्या कार्यक्रमात बदल झाल्याने तो शनिवारी उपस्थित राहणार असल्याचे हिरोच्या सुत्रांनी सांगितले.

ऑटो एक्सपोमध्ये 'छोटा भीम' सुरक्षित वाहतुकीच्या टिप्स देणार आहे. याशिवाय ऑटो एक्सपोमध्ये येणार्‍या चिमुरड्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी सोनीचे 'प्ले स्टेशन' लावण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, 'ऑटो एक्सपो'च्या दुसर्‍या दिवशी लॉन्च झाले हे मॉडेल...