आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'MARUTI CELERIO\' लॉन्‍च; किंमत 3.9 लाख , 23 किमीचा मायलेज!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
MARUTI CELERIO - Divya Marathi
MARUTI CELERIO

ग्रेटर नोएडा- 'ऑटो एक्‍सपो 2014'च्या दुसर्‍या दिवशी अर्थात आज (गुरुवारी) मारुतीने आपली बहुचर्चित आणि ऑटोमॅटीक कार 'सेलेरियो' लॉन्च केली. या कारचे 23.1 किमी प्रति लीटर मायलेज आहे. उल्लेखनिय म्हणजे सप्तरंगात ही कार सादर करण्‍यात आली आहे. यात सनशाइन रे, फेरुलिन ब्लू, केव्ह ब्लॅक, ब्लेजिंग रेड, पर्ल व्हाइट, सिल्की सिल्वर, ग्रे या रंगांचा समावेश आहे. 'सेलेरियो' ही कार चार व्हर्जनमध्ये सादर झाली आहे. त्यात Lxi, Vxi, Zxi आणि Zxi optional आहे.

दरम्यान, 'इंडिया एक्सपो मार्ट'मध्ये 5 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या 'ऑटो एक्‍सपो'मध्ये पहिल्या दिवशी तब्बल 40 मॉडेल लॉन्‍च झाले. आजही (गुरुवारी) अनेक मॉडेल लॉन्‍च झाल्या. त्यात मारुतीची भारताील पहिली ऑटोमॅटीक कार 'सेलेरियो'चाही समावेश आहे: ही कार लॉन्च होताच तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

सेलेरियोच्या रुपात भारत पहिल‍ी ऑटोमॅटीक कार धावणार आहे. त्यात मॅनुअली गेअर बदलण्याची गरज पडणार नाही. यात ऑटोमॅटीक गेअर बॉक्‍स आहे. सेलेरियोचे 6 पेट्रोल व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्‍यात आली आहे. या ऑटोमॅटीक कारची किंमत 3.9 लाख रुपयांपासून 4.59 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

एक्सपोच्या पहिल्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने जगुआरचर 'रेंजरोवर' लॉन्च केली. माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याने ' BMW' ची 'BMW i8' कॉन्सेप्ट कार लॉन्च केली. 'मिशन इंपॉसिबल-4' या सिनेमात सचिनने ही कार पाहिल्याचे याप्रसंगी सांगितले. 'BMW i8' पाहून खूप उत्साहीत असल्याचेही सचिनने म्हटले.

वाहन निर्मात्या अनेक कंपन्यांनी आपल्या भविष्यात लॉन्च होणार्‍या कारच्या कॉन्सेप्ट सादर केल्या आहेत. त्याला 'कॉन्सेप्ट लॉन्चिंग' असेही म्हटले जाते. एक्सपोमध्ये स्वस्त कार पासून महागड्या कारपर्यंत सर्व प्रकारच्या कार सादर करण्‍यात येणार आहे. टू-व्हीलर्सबाबत सांगायचे झाले तर 100cc च्या 'स्प्लेंडर'पासून 750cc च्या 'हार्ले डेव्हिडसन'पर्यंत सादर करण्यात आले आहे. ऑटो एक्सपो 7 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांसाठी खुला ठेवण्यात येणार असून तो 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

एक्‍सपो पहिल्या दिवशी लॉन्‍च झालेल्या मॉडेलबाबत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍वर क्लिक करा...